ऊस गाळपात आघाडीवर अन् भाव देण्यात पिछाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:39 AM2021-09-24T04:39:24+5:302021-09-24T04:39:24+5:30

पुरूषोत्तम करवा माजलगाव : तालुक्यात मागील वर्षी तीन साखर कारखान्यांकडून ऊसाचे नॉनस्टॉप गाळप करण्यात आले. या तिन्ही कारखान्यांनी २१ ...

Sugarcane sifting at the forefront and lagging behind at the end | ऊस गाळपात आघाडीवर अन् भाव देण्यात पिछाडीवर

ऊस गाळपात आघाडीवर अन् भाव देण्यात पिछाडीवर

Next

पुरूषोत्तम करवा

माजलगाव : तालुक्यात मागील वर्षी तीन साखर कारखान्यांकडून ऊसाचे नॉनस्टॉप गाळप करण्यात आले. या तिन्ही कारखान्यांनी २१ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून २० लाख क्विंटल साखरेचे उत्पादनही मिळवले. एवढ्या मोठ्या प्रमाणात ऊसाचे गाळप करण्यात माजलगाव तालुका हा मराठवाड्यात प्रथम होता. मात्र, ऊसाला भाव देण्यात इतर कारखान्यांच्या तुलनेत तालुक्यातील कारखान्यांनी एफआरपीपेक्षा जास्त भाव दिला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी कायम आहे.

माजलगाव धरणामुळे संपूर्ण तालुका हा मागील वीस वर्षांपासून सुजलाम् सुफलाम् झाला आहे. तीस वर्षांपूर्वी माजी उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके यांनी तेलगाव येथे सहकारी साखर कारखाना उभारला. त्यामुळे या भागात ऊस लागवड मोठ्या प्रमाणावर होऊ लागली. त्यानंतर माजी आमदार बाजीराव जगताप यांनीही आणखी एक साखर कारखाना उभारण्याची तयारी केली. मात्र, भूमिपूजनानंतर १५-१६ वर्षे स्थानिक राजकारणामुळे हा कारखाना पूर्ण होऊ शकला नाही. याचदरम्यान डॉ. आर. जी. बजाज यांनी खासगी साखर कारखाना उभारल्याने या भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. माजलगाव तालुक्यातील ऊस लागवडीवर तीन कारखाने उत्तमरित्या चालत असून, लगतच्या तालुक्यातील कारखानेदेखील या भागातील ऊस घेऊन जात आहेत. मागील दोन वर्षांत माजलगाव तालुका व परिसरात चांगला पाऊस पडल्याने या भागात मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड झाली होती. यामुळे गतवर्षी या कारखान्यांनी सहा महिने गाळप केले.

---------

कारखाना - गाळप साखर उतारा

३ कारखाने एकूण गाळप २१ लाख २५ हजार १६३

कै. सुंदरराव सोळंके सह. साखर कारखाना, तेलगाव - ८ लाख २१ हजार ४७९ मे. टन १०.४५

छत्रपती सहकारी साखर कारखाना, सावरगाव - ३ लाख ६३ हजार ८३१ मे. टन ०९.९५

जयमहेश शुगर्स, पवारवाडी - ९ लाख ३९ हजार ८३५ मे. टन ०९.९०

-----------

तेलगाव येथील सोळंके कारखाना व जयमहेश शुगर्समध्ये उपपदार्थ निर्मिती होते. त्यामुळे या कारखान्यांकडून शेतकऱ्यांना जास्त भाव मिळण्यास अडचणी असतात. तर उपपदार्थ निर्मिती नसलेला सावरगाव येथील छत्रपती साखर कारखान्याची एफआरपी जास्त आल्याने टनामागे दोन्ही कारखान्यांच्या तुलनेत या कारखान्याकडून तुलनेने जास्त पैसे मिळाले.

----

माजलगाव तालुक्यातील दोन्ही कारखान्यांच्या तुलनेत आमचा कारखाना नवखा व उपपदार्थ नसलेला कारखाना असताना आम्ही एफआरपी जास्त मिळवत शेतकऱ्यांना जास्त भाव दिला. यापुढेही या कारखान्यांबरोबर भाव देणार आहोत. - मोहन जगताप, उपाध्यक्ष, छत्रपती सहकारी साखर कारखाना

Web Title: Sugarcane sifting at the forefront and lagging behind at the end

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.