ऊस दराचा तिढा सुटला, फड फुलला !
By admin | Published: November 4, 2016 08:35 AM2016-11-04T08:35:56+5:302016-11-04T08:56:56+5:30
हातकणंगलेमधील हेर्ले येथील फडात ऊस तोडणी मजुरांचे कुटुंब दाखल झाले आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 4 - राज्यभर 5 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या गाळप हंगामात कोल्हापूर जिल्ह्याने ऊसदराची कोंडी फोडत शासनाच्या जाहीर ‘एफआरपी’पेक्षा 175 रुपये अधिक दर देण्याबाबत नुकतीच घोषणा केली. पहिल्या उचलीचा तिढा बुधवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, कारखानदार आणि शेतकरी संघटना यांच्यात झालेल्या बैठकीत सुटला आहे. त्यामुळे हंगामाच्या तयारीने वेग घेतला आहे.
जिल्ह्यातील बहुतांश कारखाने उद्यापासून (शनिवार) सुरू होत असल्याने, कारखान्यांचा परिसर गजबजू लागला आहे. हातकणंगलेमधील हेर्ले येथील फडात ऊस तोडणी मजुरांचे कुटुंब दाखल झाले आहेत.
तर, कोल्हापुरातील कसबा बावडा येथील राजाराम कारखान्याच्या वतीने ऊस वाहतुकीसाठी वापरण्यात येणा-या बैलगाडींची डागडुजी करण्यात येत आहेत. राजाराम कारखान्याच्या गाडी अड्ड्यावर बीड जिल्ह्यातील ऊस तोडणी मजूर दाखल झाले असून, मजुरांनी राहण्यासाठी झोपड्यांची बांधाबांध करायला सुरुवात केली आहे.