पाण्याअभावी झाले उसाचे पाचट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 12:14 AM2018-12-17T00:14:23+5:302018-12-17T00:15:21+5:30
तालुक्यात तब्बल ३ हजार ८ हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड केली; मात्र या वर्षीच्या भयानक अशा दुष्काळामुळे पाण्याअभावी या उसाचे आता पाचट होत चालले आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
वडवणी : तालुक्यात गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे वडवणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी उसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. त्याचे कारण म्हणजे या तालुक्यातील शेतक-यांचा कल हा नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणा-या कापूस या पिकाकडे होता; पण कापसाचा खर्च जास्त आणि उत्पादन कमी हे परवडत नसल्यामुळे शेतक-यांनी उसाच्या क्षेत्राची निवड करून तालुक्यात तब्बल ३ हजार ८ हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड केली; मात्र या वर्षीच्या भयानक अशा दुष्काळामुळे पाण्याअभावी या उसाचे आता पाचट होत चालले आहे
वडवणी तालुक्याच्या शेजारी मोठी तीन धरणे आहेत. माजलगाव धरण, कुंडलिका धरण उपळी, उर्ध्व कुडलिंका धरण सोन्नाखोटा हे तीन मोठी तलाव आहेत. या तलावाचा जास्त फायदा हा वडवणी तालुक्यातील जमिनीला होत आसल्याने या भागातील जमीन ही ओलिताखाली आल्यामुळे तालुक्यातील शेतकºयांनी तब्बल ३ हजार ८ हेक्टरवर उसाची लागवड केली होती. पण यावर्षी पाऊस न पडल्यामुळे पाण्याअभावी हे उभे पीक वाळून गेली आहेत.
भयानक दुष्काळाचा फटका या पिकांना बसत आहे. जी शेतकºयांची मदार शेजारच्या धरणाच्या पाण्यावर होती, पण पाऊस नसल्यामुळे या धरणात म्हणावा तसा पाणी साठा झाला नाही. जो थोडा फार पाणी साठा झाला, तो पिण्याच्या पाण्यासाठी ही धरणे आरक्षित केली असल्यामुळे ज्या शेतकºयांनी तलावाच्या पाण्यावर ऊस लागवड केली होती; मात्र हे पाणी आरक्षित केल्यामुळे पाटाला पाणी सोडले नसल्यामुळे ऊस वाळुन गेले आहेत. आता या उसाचे करायचे तरी काय, हा गंभीर प्रश्न शेतकºयांपुढे पडला आहे. आता या उसाचे सरपण होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.