रॅगिंगला कंटाळून आत्महत्या; विद्यार्थ्याला धमकावल्याची ऑडिओ क्लिप पोलिसांच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 11:34 AM2020-02-11T11:34:34+5:302020-02-11T11:38:40+5:30

रॅगिंगला कंटाळून गेल्या आठवड्यात शुक्रवारी सकाळी घरच्यांना न सांगता शेतात जाऊन गणेशने विष प्राशन केले होते.

Suicide by bothering ragging in Beed; Audio clip of a student being threatened by police | रॅगिंगला कंटाळून आत्महत्या; विद्यार्थ्याला धमकावल्याची ऑडिओ क्लिप पोलिसांच्या हाती

रॅगिंगला कंटाळून आत्महत्या; विद्यार्थ्याला धमकावल्याची ऑडिओ क्लिप पोलिसांच्या हाती

Next
ठळक मुद्देपुढील चार वर्षे सिनिअरचा तुला त्रास होईल 

- प्रभात बुडूख 

बीड : बीड : उदगीर येथील धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालयात बीएएमएसच्या प्रथम वर्षाला शिक्षण घेत असलेल्या बीड तालुक्यातील नाळवंडी येथील गणेश कैलास म्हेत्रे (२०) या विद्यार्थ्याला धमकावल्याच्या आॅडिओ क्लिप पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. गणेशने आत्महत्या केली. 

रॅगिंगला कंटाळून गेल्या आठवड्यात शुक्रवारी सकाळी घरच्यांना न सांगता शेतात जाऊन गणेशने विष प्राशन केले होते. त्याचा बीड येथील खासगी रुग्णालयात शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. याप्रकरणी उदगीर येथील धन्वंतरी आयुवर्दिक महाविद्यालयातील वरच्या वर्गात शिक्षण घेत असणाºया विद्यार्थ्यांकडून त्याला विविध कारणांवरून छळले जात होते. ही बाब मोबाईल क्लिप मिळाल्यामुळे सोमवारी उघड झाली आहे. ही क्लिप पोलिसांना देण्यात आली असून, या विद्यार्थ्यांचा शोध लावून संबंधितांवर गुन्हे दाखल करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी म्हेत्रे कुटुंबियांच्या वतीने करण्यात आली आहे. दरम्यान याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात धमकी देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शुन्यने गुन्हा दाखल झाला असून पुढील तपासासाठी उदगीर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. गणेशच्या मोबाईलमध्ये पोलिसांना रॅगिंग झाल्याबाबत कॉल रेकॉर्डिंग मिळाल्या असून त्यात सदर विद्यार्थ्यांनी गणेशला धमकी दिल्याचे स्पष्ट होत आहे. महाविद्यालयात घडलेला हा प्रकार गंभीर स्वरुपाचा असून याप्रकरणी  महाविद्यालयाच्या प्राचार्यावर व संबंधित विद्यार्थ्यांवर कडक करवाई करावी, अशी मागणी सावता परिषदेचे अ‍ॅड. सुभाष राऊत यांनी जिल्हधिकाºयांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान याप्रकाराने बीड जिल्ह्यातील शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.

पुढील चार वर्षे सिनिअरचा तुला त्रास होईल 
गणेशच्या मोबाईलमध्ये २ कॉल रेकॉर्डिंग मिळाल्या आहे. यात ‘ तु आम्ही सांगतो तसे कर, तू गावी जाऊ नकोस, तुझी जबाबदारी माझी आहे. तू गावी गेला तर तुला चार वर्षे त्रास होईल’ असे संभाषण असणारा एक कॉल आहे. दुसरा कॉल रेकॉर्डदेखील असाच आहे, तुला चार वर्षे राहायचे आहे का? असा पुढील विद्यार्थी बोलत आहे.

Web Title: Suicide by bothering ragging in Beed; Audio clip of a student being threatened by police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.