गर्भवती विवाहितेची सासरच्या छळामुळे आत्महत्या; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 15:33 IST2019-01-15T15:32:14+5:302019-01-15T15:33:38+5:30
याप्रकरणी सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

गर्भवती विवाहितेची सासरच्या छळामुळे आत्महत्या; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
परळी (बीड) : येथील शिवाजीनगर भागात राहणाऱ्या मनिषा सुदर्शन घुगे या महिलेने सोमवारी (दि.14) दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
मनीषा यांचा विवाह 2003 मध्ये सुदर्शन घुगे बरोबर झाला होता. मनीषा यांना एक मुलगी असून त्या पाच महिन्यांच्या गर्भवती होत्या. मागील काही दिवसांपासून मनीषाचा पती व सासरे -केशव घुगे, सासु -कुसुमबाई घुगे, पती -सुदर्शन घुगे, भाया- सदाशिव घुगे, जाउ- सुरेखा घुगे यांनी वेल्डिंग दुकानासाठी माहेरहुन एक लाख रुपये आणण्यासाठी छळ सुरु केला. या त्रासास कंटाळून त्यांनी सोमवारी आत्महत्या केली.
या प्रकरणी मनीषा यांचा भाऊ हरिदास मुंडे याने पोलिसात तक्रार दिली .यावरून भादवि 306, 498 अ, 34 प्रमाणे सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मनीषा यांच्या पतीला व भायाला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास संभाजीनगर ठाण्याचे पीएसआय रमेश जाधवर हे करत आहेत.