आंबेवडगाव परिसरात उन्हाळी भुईमुगाचे पीक जोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:29 AM2021-03-15T04:29:32+5:302021-03-15T04:29:32+5:30
तालुक्यातील आंबेवडगाव परिसरात डोंगराळ भागात सध्या रब्बी हंगामातील उन्हाळी भुईमुगाचे पीक हिरवीगार दिसत आहेत. त्यामुळे परिसर हिरवागार दिसत ...
तालुक्यातील आंबेवडगाव परिसरात डोंगराळ भागात सध्या रब्बी हंगामातील उन्हाळी भुईमुगाचे पीक हिरवीगार दिसत आहेत. त्यामुळे परिसर हिरवागार दिसत आहे. जवळच उपळी कुंडलिका तलाव असल्यामुळे पाण्याची कमतरताही पिकांना भासत नाही. त्यामुळे पिकांना भरपूर प्रमाणात पाणी दिले जाते. पाणी फाऊंडेशनची कामे झाल्यामुळे डोंगरात पाणी अडविले गेले. सध्या आंबे वडगाव हे समृद्ध गाव योजनेमध्ये सहभागी झाले आहे. गावात कामे पाणी फाऊंडेशनचे चांगले झाले आहेत त्याचा फायदा म्हणून अजूनही विहिरी पाण्याने तुडुंब भरल्या आहेत. भुईमुगाचे पीक यावर्षी मोठ्या प्रमाणात होणार हे दिसत असून, शेतकरी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनवाढीसाठी मेहनत घेताना दिसत आहे.
===Photopath===
140321\img-20210314-wa0139_14.jpg
===Caption===
धारूर तालुक्यातील आंबेवडगाव परीसरात उन्हाळी भुईमुगाचे पीक जोमात आले आहे.