धारूर बाजार समितीच्या सभापतिपदी सुनील शिनगारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 04:08 AM2021-07-13T04:08:16+5:302021-07-13T04:08:16+5:30

धारूर : धारूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपाचे सुनील शिनगारे यांनी बाजी मारली असून ही संस्था ताब्यात ...

Sunil Shingare as the Chairman of Dharur Market Committee | धारूर बाजार समितीच्या सभापतिपदी सुनील शिनगारे

धारूर बाजार समितीच्या सभापतिपदी सुनील शिनगारे

धारूर : धारूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपाचे सुनील शिनगारे यांनी बाजी मारली असून ही संस्था ताब्यात ठेवण्यात यश मिळवले आहे. या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

धारूर बाजार समितीचे संचालक मंडळाची मुदत नऊ महिने राहिली आहे. ही संस्था भाजपाच्या ताब्यात आहे. सभापती महादेव बडे यांच्या अकाली निधनाने हे पद रिक्त झाले होते. येथील सभापती निवडीसाठी सहायक निबंधक मोटे यांच्या उपस्थितीत बैठक होऊन सभापतिपदासाठी भाजपाकडून विद्यमान उपसभापती सुनील शिनगारे व माजी उपसभापती महादेव तोंडे यांचे अर्ज दाखल करण्यात आले, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून चंद्रकांत लगड यांचा अर्ज दाखल करण्यात आला होता.

भाजपातील अंतर्गत गटबाजीचा फायदा घेता येईल का, या हेतूने हा अर्ज दाखल करण्यात आला. मात्र, निवडणुकीत प्रत्यक्ष भाजपाकडून विद्यमान उपसभापती सुनील शिनगारे यांचा अर्ज ठेवण्यात आला. महादेव तोंडे यांचा अर्ज मागे घेण्यात आला. भाजपाचे सुनील शिनगारे व राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत लगड यांच्यामध्ये सरळ लढत झाली. गुप्त मतदान पद्धतीने मतदान घेण्यात झाले. भाजपाचे सुनील शिनगारे यांना दहा, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत लगड यांना सात मते मिळाली. पक्षीय बलाबलानुसार मतदान पडल्याने संस्था भाजपाच्या ताब्यात ठेवण्यात यश आले.

सभापती सुनील शिनगारे यांच्या निवडीने सर्वत्र आनंद व्यक्त केला जात होता. ही संस्था भाजपाच्या ताब्यात ठेवण्यासाठी युवक नेते रमेश आडसकर व राजाभाऊ मुंडे हे सुरुवातीपासून लक्ष ठेवून होते. निवडीच्या दिवशी धारूर येथे तळ ठोकून होते. संचालकांना विचारात घेऊन त्यांनी ही निवड केली. सभापतिपदी सुनील शिनगारे यांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला.

120721\img_20210712_143822.jpg

सुनिल शिनगारे सभापती बाजार समिती धारूर

Web Title: Sunil Shingare as the Chairman of Dharur Market Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.