वसतिगृह अधीक्षकाने लाटला कर्मचाऱ्यांचा पगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 11:50 PM2018-10-17T23:50:44+5:302018-10-17T23:51:17+5:30
तालुक्यातील महात्मा ज्योतीबा फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृहाच्या तत्कालीन अधीक्षकाने कर्मचाºयांचा ९ महिन्यांचा २ लाख ७० हजारांचा पगार परस्पर लाटल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी सदर अधीक्षकावर केज पोलिसात फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
केज : तालुक्यातील महात्मा ज्योतीबा फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृहाच्या तत्कालीन अधीक्षकाने कर्मचाºयांचा ९ महिन्यांचा २ लाख ७० हजारांचा पगार परस्पर लाटल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी सदर अधीक्षकावर केज पोलिसात फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे.
केज शहरात महात्मा ज्योतीबा फुले शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेमार्फत महात्मा मुले मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृह चालवण्यात येते. मान्यताप्राप्त अनुदानित वसतिगृहामध्ये अधीक्षक, चौकीदार, मदतनीस, २ स्वयंपाकी असे एकूण पाच कर्मचारी आहेत. समाजकल्याण विभागाकडून आलेला मानधनरुपी पगार संस्थेच्या अधीक्षकाच्या खात्यावर जमा होतो. या संस्थेत १ जून २०१७ ते ३१ मे २०१८ या कालावधीत सिताराम किसनराव वैरागे हा अधीक्षक पदावर कार्यरत होता. त्यामुळे संस्थेचे कर्मचाºयांच्या पगाराच्या बँक खात्याचे चेकबुक त्याच्याकडे होते. परंतु, कर्मचाºयांचे पगार वेळेवर न करणे, वसतिगृहाकडे जबाबदारीने लक्ष देण्यात कसूर केल्यामुळे सीतारामला १ डिसेंबर २०१७ रोजी कामावरून कमी करण्यात आले. त्यानंतर सीतारामने चेकबुक संस्थेकडे जमा करणे आवश्यक असताना ते गहाळ झाल्याचे त्याने संस्थेस कळविले. तद्नंतर १ जून २०१८ रोजी वसतिगृह अधीक्षक पदी आसेफ मोहमोद्दीन मुलानी यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानुसार २८ जून रोजी संस्थेच्या बँक खात्याच्या सह्याचे अधिकार मुलानी यांना देण्यात आले. दरम्यानच्या काळात ३१ मार्च २०१८ रोजी समाजकल्याण विभागाकडून कर्मचाºयांच्या थकीत पगाराचा २ लाख ७० हजारांचा धनादेश बँकेत २९ जून रोजी बँकेत जमा करण्यात आला. मात्र, आधीचा व्यवस्थापक सीताराम वैरागे याने त्याच्याजवळ असलेल्या जुन्या धनादेशांचा वापर करून कर्मचाºयांच्या पगाराची सर्वच्या सर्व २ लाख ७० हजारांची रक्कम ३ ते २० आॅगस्ट या कालवधीत तीन टप्प्यात परस्पर उचलून घेतली. २३ आॅगस्ट रोजी विद्यमान अधीक्षक मुलानी यांनी बँकेतून खात्याचे स्टेटमेंट काढले असता त्यांना अपहार झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे संस्थेच्या संचालक मंडळाने सीताराम वैरागेला रक्कम जमा करण्यास सांगितले. परंतु, रक्कम जमा करण्याचे अश्वासन देऊनही त्याने अद्यापपर्यंत एक छदामही दिला नाही, अशी तक्रार संस्थेचे संचालक दगडू एकनाथ गालफाडे यांनी केज पोलिसात दिली. सदर तक्रारीवरून सीताराम वैरागे याच्यावर केज पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.