खते, बियाणे विक्रीवर भरारी पथकांची निगराणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:56 AM2021-05-05T04:56:02+5:302021-05-05T04:56:02+5:30

बीड : खरीप हंगामात खते, बियाणे यांचा काळाबाजार होऊ नये. शेतकऱ्यांच्या माथी निकृष्ट दर्जाचे बियाणे मारण्यात येऊन त्यांची आर्थिक ...

Supervision of flying teams on sale of fertilizers and seeds | खते, बियाणे विक्रीवर भरारी पथकांची निगराणी

खते, बियाणे विक्रीवर भरारी पथकांची निगराणी

Next

बीड : खरीप हंगामात खते, बियाणे यांचा काळाबाजार होऊ नये. शेतकऱ्यांच्या माथी निकृष्ट दर्जाचे बियाणे मारण्यात येऊन त्यांची आर्थिक पिळवणूक होऊ नये, यासाठी खते आणि बियाण्यांच्या विक्री पुरवठ्यावर निगराणी ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय भरारी पथके गठीत करण्यात आली आहेत.

जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सुभाष साळवे यांच्या नेतृत्वात जिल्हास्तरीय पथक तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये जिल्हा गुणनियंत्रण निरिक्षक एस. डी गरंडे, मोहीम अधिकारी बी. एम. खेडकर व वजन व मापे निरीक्षक के. ए. दराडे यांची नियुक्ती केली आहे.

खरीप हंगामात बोगस बियाणे विक्रीची शक्यता लक्षात घेत ही पथके गठीत करण्यात आली आहेत. बीड तालुकास्तरीय पथकामध्ये प्रमुख म्हणून तालुका कृषी अधिकारी बी. आर. गंडे हे काम पाहणार आहेत. या पथकामध्ये कृषी अधिकारी बी. एम. खेडकर, वजन मापे निरीक्षक दराडे यांचा समावेश आहे. पाटोदा तालुकास्तरांवर पथक प्रमुख म्हणून तालुका कृषी अधिकारी अमृत गांगर्डे यांची नेमणूक झाली आहे. त्यांच्या पथकामध्ये कृषी अधिकारी जे. एम. भुतपल्ले हे काम पाहतील. आष्टी तालुकास्तरीय पथक प्रमुख म्हणून तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर हे कार्यरत आहेत. त्यांना कृषी अधिकारी एन. एस. राऊत हे सहकार्य करतील.‍ शिरूर तालुकास्तरांवर पथक प्रमुख म्हणून तालुका कृषी अधिकारी अमृत गांगर्डे यांची नेमणूक झाली आहे. त्यांच्या पथकामध्ये कृषी अधिकारी एस. बी. करंजवणकर हे काम पाहतील. माजलगाव तालुकास्तरावर पथक प्रमुख म्हणून तालुका कृषी अधिकारी एस. एस. संगेकर यांची नेमणूक झाली आहे. त्यांच्या पथकामध्ये कृषी अधिकारी एस. जी. हजारे हे काम पाहतील. गेवराई तालुकास्तरावर पथक प्रमुख म्हणून तालुका कृषी अधिकारी हर्षवर्धन खेडकर यांची नेमणूक झाली आहे. त्यांच्या ‍पथकामध्ये कृषी अधिकारी अनिरुद्ध सानप हे काम पाहतील.

धारूर तालुकास्तरावर पथक प्रमुख म्हणून तालुका कृषी अधिकारी एस .डी. ‍शिनगारे यांची नेमणूक झाली आहे. त्यांच्या पथकामध्ये कृषी अधिकारी डाके हे काम पाहतील. वडवणी तालुकास्तरावर पथक प्रमुख म्हणून तालुका कृषी अधिकारी यू. ए. गर्जे यांची नेमणूक झाली आहे. त्यांच्या पथकामध्ये कृषी अधिकारी भदेवाड हे काम पाहतील. अंबाजोगाई तालुकास्तरावर पथक प्रमुख म्हणून तालुका कृषी अधिकारी गोविंद ठाकूर यांची नेमणूक झाली आहे. त्यांच्या पथकामध्ये कृषी अधिकारी प्रवीण मोरे हे काम पाहतील. केज तालुकास्तरावर पथक प्रमुख म्हणून तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत देशमाने यांची नेमणूक झाली आहे. त्यांच्या पथकामध्ये कृषी अधिकारी एस. डी. घुमरे हे काम पाहतील. परळी तालुकास्तरावर पथक प्रमुख म्हणून तालुका कृषी अधिकारी ए. ए. सोनवणे यांची नेमणूक झाली आहे. त्यांच्या पथकामध्ये कृषी अधिकारी एस. एल. कांदे हे काम पाहतील.‍ असे एस.एम.साळवे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, बीड यांनी प्रसिध्दी पत्रकद्वारे कळविले आहे.

Web Title: Supervision of flying teams on sale of fertilizers and seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.