दिव्यांग मतदारांना १५०० दूतांचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 12:16 AM2019-10-22T00:16:59+5:302019-10-22T00:18:00+5:30

जिल्ह्यात ज्या मतदान केंद्रावर दिव्यांग मतदार आहेत, अशा ठिकाणी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने १५०० दुतांची नियूक्ती करण्यात आली होती.

Support of 2 ambassadors for the disabled voters | दिव्यांग मतदारांना १५०० दूतांचा आधार

दिव्यांग मतदारांना १५०० दूतांचा आधार

Next
ठळक मुद्देसामाजिक न्याय विभागाचे नियोजन : बीड जिल्ह्यातील १३५३ मतदान केंद्रांवर केली सोय

बीड : जिल्ह्यात ज्या मतदान केंद्रावर दिव्यांग मतदार आहेत, अशा ठिकाणी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने १५०० दुतांची नियूक्ती करण्यात आली होती. हे दुत सोमवारी दिव्यांसाठी आधार ठरले. सहायक आयुक्त डॉ.सचिन मडावी यांनी याचा जिल्ह्यात सर्वत्र फिरून आढावा घेतला. १३५३ केंद्रांवर दुतांची नियूक्ती करण्यात आली होती.
बीड जिल्ह्यात विधानसभेच्या सहा मतदार संघात सोमवारी मतदान झाले. जिल्ह्यात दिव्यांग मतदारांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. एकूण केंद्रांपैकी १३५३ केंद्रांवर दिव्यांग मतदार मतदानासाठी येणार होते. हाच धागा पकडून सामाजिक न्याय विभागाने नियोजन केले. या सर्व बुथवर १५०० दुत मदतीसाठी नियूक्त केले. पैकी ३५० महिला, विद्यार्थिनींचा समावेश होता. तसेच बीड, आष्टी येथे काही महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनाचे विद्यार्थीही मदतीसाठी दुत म्हणून घेतले होते. दिवसभर या दुतांनी दिव्यांग मतदारांना मदत केली.
दरम्यान, परळी तालुक्यातील सफदराबाद येथे दिव्यांग मतदान केंद्र स्थापन केले होते. येथे मतदारांचा पुष्पगुच्छ देऊन आयुक्त डॉ.सचिन मडावी यांनी सत्कार केला. तसेच इतर केंद्रांवरही सत्कार करण्यात आले. व्हिलचेअर, काठी व इतर साहित्य उपलब्ध करून देण्यात आले होते. या दुतांमुळे दिव्यांगाचा त्रास कमी झाल्याचे सांगण्यात आले.
लोकसभेलाही मोठी मदत
लोकसभा निवडणूकीतही अशी संकल्पना राबविण्यात आली होती. याचा मोठा फायदा प्रशासनाला झाला होता.
त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीतही दिव्यांगांचा त्रास कमी करण्यात दुतांचा मोठा वाटा आहे.
दिवसभर हे दुत मतदारांना ये-जा करण्यासाठी मदत करीत होते.

Web Title: Support of 2 ambassadors for the disabled voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.