विकास, परिवर्तनासाठी साथ द्या- क्षीरसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 12:20 AM2019-08-18T00:20:29+5:302019-08-18T00:20:40+5:30

विरोधकांनी दुसऱ्याच्या उट्ट्या काढत बसू नयेत, विकासाची कामे करून दाखवावीत, असे आवाहन राज्याचे रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले

Support development, transformation | विकास, परिवर्तनासाठी साथ द्या- क्षीरसागर

विकास, परिवर्तनासाठी साथ द्या- क्षीरसागर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : लोकसभेच्या निवडणुकीत ढेकनमोहा परिसर मोठ्या ताकतीने युतीच्या मागे उभा राहिला होता. आता विधानसभेला ही तितक्याच ताकदीने उभे रहा. परिवर्तनासाठी ताकतीने साथ द्या पुढच्या पिढीचे भविष्य घडवायचे असेल तर विकास कामे करणे गरजेची आहेत. आता बाण हातात आहे, घड्याळ बंद पडले आहे, असे सांगून विरोधकांनी दुसऱ्याच्या उट्ट्या काढत बसू नयेत, विकासाची कामे करून दाखवावीत, असे आवाहन राज्याचे रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले आहे
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून नवीन रस्ते कामांच्या आणि गोरक्षनाथ टेकडी येथील रस्ते सुधारणा कामांच्या एकूण चार कोटी १७ लाख रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते आज झाला. बीड तालुक्यातील गोरक्षनाथ टेकडी, ढेकणमोहा येथे झालेल्या या भूमिपूजन समारंभास गोरक्षनाथ टेकडी देवस्थानचे ह.भ.प. नवनाथ महाराज, नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर, जिल्हाप्रमुख सचिन मुळक, जगदीश काळे, अरूण डाके, विलास बडगे, दिलीप गोरे, दिनकर कदम, गणपत डोईफोडे उपस्थित होते.
भूमीपूजनांनंतर शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना क्षीरसागर म्हणाले की, आम्ही बिघडलेले घड्याळ काढून धनुष्य हाती घेतले आहे, स्व बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आणि माझे सहकारी माझ्याबरोबर समर्थपणे साथीला आहेत त्यामुळेच लोकसभा निवडणुकित युतीला चांगले मतदान ढेकनमोहा परिसरातून मिळाले त्यापेक्षाही अधिक मतदान आता विधानसभेला मिळणार आहे, असा मला ठाम विश्वास आहे. पुढच्या पिढीसाठी विकास कामे महत्वाची आहेत, दिलेला शब्द आज पूर्ण करतोय.
गोरक्षनाथ टेकडीच्या रस्त्यासाठी ४० लाखांचा निधी टाकला आहे, पुढचा टप्पा पूर्ण रस्ते करून घेण्यासाठी राहील, योजना आणण्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाहीत, युतीचे सरकार जनतेच्या भल्याचे सरकार आहे हे ओळखून घ्या, बीड-गेवराई मार्गाच्या जमिनीचा मावेजा जसा मिळवून दिला तसा बीड ते परळी मार्गाचा मावेजा देखील मिळवून देऊत, आम्ही घोषणा करत नाहीत तर त्या पूर्णच करतो.
दुष्काळी मराठवाडा पाण्याच्या प्रश्नाने चिंतेत आहे ही चिंता मिटवण्यासाठी मोठा आराखडा तयार करण्यात आला आहे, डीपीआरचे काम अंतिम टप्यात आहे, शेतकऱ्यांच्या मागण्या विनाअट मंजूर करण्याचे आदेश दिले आहेत, मागेल त्याला शेततळे दिले जाईल, असेही क्षीरसागर यांनी यावेळी सांगितले.
रोहयोमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ढेकणमोहा -कराळवाडी- निर्मळवाडी या ६.९० किलोमीटर लांबीच्या व ३ कोटी ९९ लक्ष रु पयांच्या कामाचे भूमिपूजन करून आश्वासन पाळले.
तसेच गोरक्षनाथ टेकडी येथे १८ लक्ष रु पये खर्चाच्या बीड परळी मार्ग ते गोरक्षनाथ टेकडी रस्ता सुधारणा कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

Web Title: Support development, transformation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.