रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नछत्राचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:33 AM2021-05-23T04:33:17+5:302021-05-23T04:33:17+5:30

मागील वर्षीप्रमाणेच याही वर्षी कोविड महामारीचे संकट अधिकच गडद होत आहे. संसर्ग व मृत्यूचे प्रमाण दररोजच वाढत आहे.या वर्षी ...

Support to relatives of patients | रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नछत्राचा आधार

रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नछत्राचा आधार

Next

मागील वर्षीप्रमाणेच याही वर्षी कोविड महामारीचे संकट अधिकच गडद होत आहे. संसर्ग व मृत्यूचे प्रमाण दररोजच वाढत आहे.या वर्षी कोविडचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासनाने लॉकडाऊन जाहीर केला आहे. यामध्ये कोविड रूग्ण,नातेवाईक,सामान्य कष्टकरी लोकांना दोन वेळचे जेवण मिळणेही दुरापास्त झाले आहे.अशा परिस्थितीत श्रीराम जन्मोत्सव समितीचे अन्नछत्र आशेचे किरण ठरले आहे. याद्वारे रूग्ण,नातेवाईक व गरजूंना दिलासा मिळत आहे.

मागील पंधरा दिवसांपासून रीब,गरजू लोक, रूग्ण व नातेवाईकांना दररोज पोळी,भाजी, पुलाव,लोणचे तर कधी गोड पदार्थ असे पौष्टिक व स्वादिष्ट जेवण देण्यात येत आहे. लॉकडाऊनमुळे आज अनेक गावे,खेडी व शहरे ही शांत आहेत.पण,रूग्णालये मात्र रूग्णांनी मोठ्या प्रमाणावर भरलेली दिसून येत आहेत. अंबाजोगाई येथील स्वाराती ग्रामीण शासकीय वैद्यकीय रूग्णालय आणि लोखंडी सावरगावचे कोविड रूग्णालयात भरपूर संख्येने रूग्ण व त्यांचे नातेवाईक,गरजू लोक हे उपचारासाठी येत आहेत.या गरजू लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय श्रीराम जन्मोत्सव समिती, अंबाजोगाईचे अमित जाजू,योगेश कडबाने, बाळा गायके,शुभम लखेरा,विजय रामावत,शुभम डिडवाणी,सतिश केंद्रे,शुभम चौधरी, सौरभ नारायणकर, नवनाथ अप्रूपपल्ले, योगेश म्हेञजकर, सिध्दू सातपुते, गजानन सुरवसे, बालाजी मारवाळ या तरूण कार्यकर्त्यांनी घेतला. २३ एप्रिल रामनवमी पासून स्वत:च्या पैशातून शासन निर्देशानुसार सर्व नियमांचे पालन करीत अन्नछत्र सुरू करून मागील एक महिन्यापासून अव्याहतपणे सुरू ठेवले आहे. समितीच्या तरूण कार्यकर्त्यांचे प्रामाणिक प्रयत्न व तळमळ पहाता आता अनेक दानशूर व्यक्ती आपली नांवे जाहीर करू नका या अटीवर मदतीसाठी पुढाकार घेत आहेत. आता पुढील १५ दिवस समितीच्यासोबत ज्ञान प्रबोधिनीदेखील अन्नछत्राच्या माध्यमातून जेवण देण्याच्या या मोहीमेत सक्रिय सहभाग घेणार असल्याचे सांगण्यात येते.

दात्यांनी पुढे यावे

कोरोना या महामारीचे आलेले संकट लवकर दूर होईल,यासाठी प्रत्येकाने नियमित मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा,गर्दीत जाणे टाळावे,या त्रिसूत्रीचे पालन करावे. दररोज किमान ५०० गरजू लोकांना अन्नदान करण्याचा आमचा संकल्प आहे.या कामात समाजातील जे दानशूर व्यक्ती,संस्था आणि संघटना ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन श्रीराम जन्मोत्सव समितीचे अमित जाजू यांनी केले आहे.

===Photopath===

220521\avinash mudegaonkar_img-20210522-wa0091_14.jpg

Web Title: Support to relatives of patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.