सामाजिक परिवर्तनासाठी साथ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2019 12:03 AM2019-10-06T00:03:20+5:302019-10-06T00:03:54+5:30

माझ्यासाठी पंधरा दिवस द्या, पाच वर्ष तुमच्यासाठी हक्काने सेवा करवून घ्या, सामाजिक परिवर्तनासाठी साथ द्या, असे आवाहन बीड मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्ता बैठकीत बोलताना जयदत्त क्षीरसागर यांनी केले.

Support social change | सामाजिक परिवर्तनासाठी साथ द्या

सामाजिक परिवर्तनासाठी साथ द्या

Next
ठळक मुद्देजयदत्त क्षीरसागर । मला निवडून द्या अन् माझ्याकडून ५ वर्षे हक्काने सेवा करवून घ्या

बीड : बौध्द समाजाने दिलेला शब्द काळया दगडावरची रेघ आहे. माझे म्हणने पटत असेल तर साथ द्या, तुमची साथ ही सामाजिक परिवर्तनाची नांदी असते. माझ्यासाठी पंधरा दिवस द्या, पाच वर्ष तुमच्यासाठी हक्काने सेवा करवून घ्या, सामाजिक परिवर्तनासाठी साथ द्या, असे आवाहन बीड मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्ता बैठकीत बोलताना जयदत्त क्षीरसागर यांनी केले.
शनिवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर कदम, दिलीप गोरे, अशोक कांबळे, नाना मस्के, आशिष चव्हाण, न.से.संजय होळकर, सचिन सोनवणे आदिंची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्र माचे अध्यक्ष प्रकाश वडमारे हे होते.
याप्रसंगी शिरूर पंचायत समितीच्या सदस्या उषा सरवदे म्हणाल्या की, बीड मतदार संघात आण्णा हेच पक्ष मानून धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटण दाबा आणि गोरगरीबांची, दलित पीडितांची सेवा करणाऱ्या जयदत्तअण्णांना विधानसभेत पाठवा. याप्रसंगी रिपाई एकतावादीचे जिल्हाध्यक्ष आशिष चव्हाण, अशोक कांबळे म्हणाले की, काकू-आण्णा-डॉ.भारतभूषण हे गोरगरीबांचे बीडमधील तारणहार आहेत. त्यांना साथ देणे हे आमचे कर्तव्य आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक दिलीप भोसले यांनी केले. याप्रसंगी अमोल पौळ, अमोल अहिरे, संगीता गायकवाड, बाळासाहेब काकडे, प्रियंका कामटे, राम हिरवे, कौशल्या गायकवाड, बबिता वडमारे, कमल पेठे, बबिता जावळे, जयश्री गवळी, कांता सरवदे, दिपा वंजारे, ईश्वरी धन्वे आदींसह पुरूष, महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्तेची खुर्ची समाज परिवर्तनासाठी
जयदत्तआण्णा म्हणाले की, सत्तेची खुर्ची समाज परिवर्तनासाठी असते. दुष्काळ हा भूतकाळ करावयाचा आहे. मलमपट्टया करून भागत नाही त्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करून समुद्राला वाहून जाणारे ६०० टी.एम.सी. पाणी मराठवाड्यातील ११ मोठ्या तलावात सोडून पिण्याचे पाणी, सिंचनाचा प्रश्न सोडविणार. २०२२ पर्यंत एकही बेघर राहणार नाही. निराधारांना आधार, आंधळ्याची काठी, महिला सक्षमीकरण, गोरगरीबांच्या कल्याणासाठी शिक्षण, आरोग्य, निवारा, रस्ते, पाणी या सर्व सुविधा प्राधान्याने बीड जिल्ह्यात आणण्यासाठी आशिर्वाद द्यावा, असे आवाहन केले.

Web Title: Support social change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.