कोट्यवधींच्या धान्य घोटाळ्यातील सहा आरोपींचे आत्मसमर्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:38 AM2021-08-24T04:38:31+5:302021-08-24T04:38:31+5:30

बीड : दोन वर्षांपूर्वी गाजलेल्या कोट्यवधी रुपयांच्या हरभरा आणि तूर घोटाळ्यातील सहा आरोपींनी २३ ऑगस्ट रोजी आर्थिक गुन्हे शाखेत ...

Surrender of six accused in multi-crore grain scam | कोट्यवधींच्या धान्य घोटाळ्यातील सहा आरोपींचे आत्मसमर्पण

कोट्यवधींच्या धान्य घोटाळ्यातील सहा आरोपींचे आत्मसमर्पण

Next

बीड : दोन वर्षांपूर्वी गाजलेल्या कोट्यवधी रुपयांच्या हरभरा आणि तूर घोटाळ्यातील सहा आरोपींनी २३ ऑगस्ट रोजी आर्थिक गुन्हे शाखेत आत्मसमर्पण केले. अधिकाऱ्यांनी त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

गणेश अनिरुध्द चोरमले (३८, खरेदी केंद्रप्रमुख वडवणी), मुंजाबा रामभाऊ मैंद (३९ , ऑपरेटर रा. चिंचाळा, ता. वडवणी), जावेद चांदसाहब बागवान (४०, खरेदी केंद्रप्रमुख बीड व गेवराई), गोविंद व्यंकटी दौंड (४२, केंद्रप्रमुख परळी), राजाराम रंगनाथ काजगुंडे (३९ ,ऑपरेटर रा. अस्वलअंबा ता. परळी), श्रीराम अच्युतराव शिंदे (३७, ऑपरेटर, रा. रामेश्वर ता.गेवराई) अशी आत्मसमर्पण करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. २०१९ मध्ये जिल्ह्यात धान्य खरेदीत मोठी अफरातफर झाली होती. जिल्हा कृषी औद्योगिक सेवा सहकारी संस्थेने मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने जिल्ह्यात तूर आणि हरभऱ्याची खरेदी केली होती. यात कोट्यवधींचा घोटाळा झाला होता. शेतकऱ्यांकडून माल खरेदी केल्यानंतर मार्केटिंग फेडरेशनकडून रक्कम उचलण्यात आली. मात्र, फेडरेशनला सदर माल दिलाच नाही. या प्रकरणात एप्रिल २०१९ मध्ये पेठ बीड पोलीस ठाण्यात १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यात जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेचे संचालक, केंद्रप्रमुख, ऑपरेटर यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.

...

केवळ एकाच आरोपीला पकडण्यात यश

आतापर्यंत केवळ चाँदसाहेब हसनभाई बागवान या एकाच आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले होते, तर इतर आरोपी फरार होते. २३ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता सहा फरार आरोपी स्वत:हून आर्थिक गुन्हे शाखेत हजर झाले. त्यांना ताब्यात घेऊन अटकेची कारवाई पूर्ण करण्यात आली. त्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली, अशी माहिती पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांनी दिली.

....

Web Title: Surrender of six accused in multi-crore grain scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.