राजपिंपरीत ५८६ कुटुंबांचे सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:33 AM2021-04-25T04:33:16+5:302021-04-25T04:33:16+5:30
बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी मिशन ...
बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी मिशन झिरो डेथ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मिशन अंतर्गत गावागावांत, तांडा, वाडी वस्तीवर जाऊन शिक्षक, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका जिवाची पर्वा न करता नागरिकांची आरोग्य तपासणी करीत आहेत. या माध्यमातून आता ग्रामीण आरोग्याची माहिती संकलित होत आहे. या मोहिमेचा पहिला टप्पा पूर्णत्वाकडे जात आहे. शिक्षक धनंजय सुलाखे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील राजपिंपरीसह परिसरातील वाडी, वस्ती, तांड्यावर घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे. १९ एप्रिल ते १० मे दरम्यान राबविण्यात येत असलेल्या मोहिमेत ९ शिक्षक, २ आशा सेविका, ३ अंगणवाडी सेविका मिळून या भागातील २९०० लोकसंख्या असलेल्या ५८६ कुटुंबांचे आरोग्य सर्वेक्षण करीत आहेत.
===Photopath===
240421\sakharam shinde_img-20210424-wa0025_14.jpg