बीडमध्ये दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 05:02 AM2021-02-18T05:02:46+5:302021-02-18T05:02:46+5:30
नोंदणीला सुरुवात : शहरात समाज कल्याण, तर ग्रामीणमध्ये बाल कल्याण विभागावर जबाबदारी बीड : जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींची माहिती घेण्यासाठी ...
नोंदणीला सुरुवात : शहरात समाज कल्याण, तर ग्रामीणमध्ये बाल कल्याण विभागावर जबाबदारी
बीड : जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींची माहिती घेण्यासाठी समाज कल्याण विभागाने सर्वेक्षण सुरू केले आहे. त्यांच्या नावनाेंदणीला सोमवारपासून सुरुवातही झाली आहे. शहरातील सर्वेक्षण हे समाज कल्याणचे शिक्षक, तर ग्रामीणमध्ये महिला व बाल कल्याण विभागाच्या अंगणवाडी सेविका आणि आशाताई करीत आहेत.
जिल्हा परिषद विभागाच्या समाज कल्याण विभागांतर्गत जिल्ह्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण करण्याची माेहीम १५ ते२८ फेब्रुवारीदरम्यान हाती घेतली आहे. यात सर्वेक्षण करून सर्वांची नावनोंदणी केली जात आहे. शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि आशाताई यांच्यावरही सर्वेक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या दिव्यांगांची संपूर्ण माहिती ‘दिव्यांगसाथी’ या वेबसाईटवर भरण्यात येणार आहे. यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांगाला प्रत्येक योजनेचा लाभ देणे शक्य होणार आहे. दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व सामाजिक संघटनांना आवाहन करून सर्वेक्षण व नावनाेंदणी करणाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन सहायक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी केले आहे. योजनांचा लाभ मिळणार थेट यापूर्वी दिव्यांगांना संपर्क करून कागदपत्रे जमा करण्यातच जास्त वेळ जात हाेता. परंतु, आता या नोंदणीमुळे गाव, तालुक्यातील दिव्यांगांची संख्या एका क्लिकवर मिळणार आहे. त्यामुळे यापुढे सर्व शासकीय योजनांचा लाभ दिव्यांगांना थेट मिळणार असल्याचे डाॅ. सचिन मडावी यांनी सांगितले.