अस्मितादर्श साहित्य संमेलनाची जय्यत तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 01:00 AM2018-10-26T01:00:44+5:302018-10-26T01:04:24+5:30

येथील मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात २७ आणि २८ आॅक्टोबरला अस्मितादर्श सािहत्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

Survival of Assimashad Sahitya Sammelan | अस्मितादर्श साहित्य संमेलनाची जय्यत तयारी

अस्मितादर्श साहित्य संमेलनाची जय्यत तयारी

Next
ठळक मुद्देजालना : कामगारनेते बाबा आढाव, सुभाष लोमटे येणार, फुलंब्रीकर नाट्यगृहात होणार संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात २७ आणि २८ आॅक्टोबरला अस्मितादर्श सािहत्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन प्रसिध्द साहित्यिक डी.बी. जगत्पुरीया यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या सोहळ्यास ज्येष्ठ माथाडी कामगार नेते बाबा आढाव आणि कामगार नेते सुभाष लोमटे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या साहित्य संमेलनात विविध विषयांवर परिसंवाद तसेच चर्चासत्र आणि कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कार्याध्यक्ष डॉ. विजय कुमठेकर यांनी दिली.
संमेलनाच्या शुभारंभ सोहळ्यानंतर दुपारी १ ते ३.३० दरम्यान पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे बहुआयामी सांस्कृतिक व्यक्तिमत्व या विषयावर डॉ. चिंतामण कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार आहे. या परिसंवादात डॉ. मिलिंद बागुल, सुरेश साबळे, डॉ. वासुदेव मुलाटे, शत्रुघ्न जाधव, डॉ. इसादास भडके, डॉ. सुशिला मुल-जाधव, प्रेमानंद गज्वी, डॉ. केशव देशमुख, डॉ. संपतराव गायकवाड, निलकांत चव्हाण, विश्वास वसेकर, वसंत शेंडे आदी मान्यवर वक्ते म्हणून सहभागी होणार आहेत. यावेळी ज्येष्ठ सामाजिक नेते अ‍ॅड. बी. एम. साळवे, सुभाष देविदान व डॉ. संजय राख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
दुपारी ३.३० ते ५.३० दरम्यान भारतीय संविधान आणि वर्तमान संदर्भ या विषयावर प्राचार्य डॉ. सुरेश वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार आहे. या परिसंवादात डॉ. रा. का. क्षीरसागर, डॉ. निलकंठ शेरे, डॉ. अनंत राऊत, डॉ. श्रीराम निकम, प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे, डॉ. वसंत डोंगरे, महेंद्र ताजणे, डॉ. प्रविण मोरे, डॉ. मा. प. थोरात, दीपकराज कापडे आदी मान्यवर वक्ते म्हणून सहभागी होणार आहेत. यावेळी अ‍ॅड. ब्रम्हानंद चव्हाण, डॉ. नारायणराव मुंढे, जयेश बाविसी आदींची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सायंकाळी साडेपाच ते साडेसात दरम्यान योगीराज वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली कथाकार विलास सिंदीकर, अर्जुन व्हटकर, दादाकांत धनविजय, अ. फ. भालेराव, प्रा. राजा जगताप, भरत गायकवाड, संघमित्रा खंडारे, के. व्ही. सरवदे, जयराज खुने, आत्माराम गोडबोले यांचे कथाकथन होणार आहे. यावेळी अ‍ॅड. शिवाजी आदमाने, ज्येष्ठ पत्रकार अंकुशराव देशमुख, डॉ. बळीराम बागल, अब्दुल हफीज आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. रात्री साडेआठ वाजता विद्रोही कवी कैलास भाले यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होणार असून, यात महाराष्ट्रातील नामवंत कवी सहभागी होणार आहेत. यावेळी प्रा. डॉ. राहुल म्हस्के, सुधाकर निकाळजे, अशोक साबळे, अण्णासाहेब खिल्लारे आदी प्रमुख उपस्थित राहील.
रविवारी सकाळी ९.३० ते ११.३० दरम्यान परिवर्तनवादी चळवळी आणि स्त्री जीवनाचे वास्तव या विषयावर प्रा. डॉ. आशा थोरात यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार आहे. या परिसंवादात उर्मिला पवार, डॉ. नंदा तायवाडे, डॉ. संध्या रंगारी, प्रा. सुशिला मोराळे, डॉ. छाया निकम, डॉ. शोभा शिंदे, सुप्रिया चव्हाण आदी वक्ते म्हणून सहभागी होणार आहेत. यावेळी शकुंतला कदम तसेच माजी नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे, विमल आगलावे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान दुपारी प्रसिध्द नाटककार व अभिनेते राजकुमार तांगडे यांची प्रकट मुलाखत होणार आहे. विजयकुमार पंडित, दीपक डोके, डॉ. प्रदीप हुसे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
दुपारी अडीच ते सायंकाळभ पाच वाजेच्या दरम्यान डॉ. दामोधर मोरे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होणार आहे. यावेळी अब्दुल रशीद अब्दुल अजीज, नारायण चाळगे, डॉ. नारायण बोराडे आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी पाच ते साडेसहा दरम्यान प्राचार्य डॉ. माधवराव गादेकर यांच्या अध्यक्षतेखाली शोधनिबंध वाचन व चर्चा होणार असून, त्यात सुषमा तायडे, डॉ. संजय शिंदे, डॉ. के. के. अहिरे, डॉ. आशा थोरात, डॉ. सुशील चिमोेरे, संगीता दोदे, डी. आर. शेळके, डॉ. भास्कर पाटील, डॉ. सतीश म्हस्के आदी सहभागी होणार आहेत. यावेळी डॉ. सुखदेव मांटे, साईनाथ पवार, गणेशलाल चौधरी आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमांना साहित्यिक रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन स्वागत देशमुख डॉ. संजय लाखे पाटील अस्मितादर्शच्या च्या संपादिका डॉ.निवेदिता पानतावणे, अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ.विजय कुमठेकर, सचिव राम गायकवाड, डॉ.रावसाहेब ढवळे, राजेश ओ.राऊत, प्रा.पंढरीनाथ सारके, रमेश देहेडकर, साईनाथ चिन्नादोरे, राजेंद्र राख, गणेश चांदोडे, नंदा पवार आदींनी केले आहे.

Web Title: Survival of Assimashad Sahitya Sammelan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.