केरूळमध्ये आढळलेल्या दुर्मीळ कस्तुरी मांजराला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:27 AM2021-05-03T04:27:24+5:302021-05-03T04:27:24+5:30

धोकादायक असलेल्या कोरड्या विहिरीत प्राणी मित्र नितीन आळकुटे हे जीवाची पर्वा न करता दोरीच्या सहाय्याने विहिरीत खाली उतरले. ...

Survival of a rare musk cat found in Kerala | केरूळमध्ये आढळलेल्या दुर्मीळ कस्तुरी मांजराला जीवदान

केरूळमध्ये आढळलेल्या दुर्मीळ कस्तुरी मांजराला जीवदान

Next

धोकादायक असलेल्या कोरड्या विहिरीत प्राणी मित्र नितीन आळकुटे हे जीवाची पर्वा न करता दोरीच्या सहाय्याने विहिरीत खाली उतरले.

भुकेने व्याकूळ झालेला हा प्राणी आक्रमकता दाखवत होता. पोटाची खळगी शांत करण्यासाठी मांजराला प्रथम खाण्यास दिले. नंतर चतुराईने त्याला पकडून पोत्यात टाकून सुखरूप बाहेर काढले. यावेळी त्यांना गणेश पवळ,दीपक पवळ, अक्षय भंडारी,दीपक घोडके,विशाल राजगुरू, डॉ. मनोजकुमार खेडकर व वनविभागाचे कर्मचारी अनिल मालेवार , एन.के.काकडे ,बी.पी.मोहळकर व इतरांनी सहकार्य केले. या मांजराला लगेचच टेंभीच्या वनात सुखरूप सोडण्यात आले.

कस्तुरी मांजर भक्ष्य मिळविण्याकरिता रात्री बाहेर येतात,

लहान पक्षी,घुशी,खारी, सरडे,लहान किडे, यासारखे प्राणी तर वनस्पतीत मुळे, फळे असे खाद्य त्यांच्या आहारात असतात.

जागतिक प्रजातींच्या 'रेड लिस्ट' मध्ये अतिदुर्मीळ प्राणी म्हणून घोषित आहे. सध्या वृक्षतोड,शिकार,वनवे पेटवणे यामुळे अनेक जीव जंतू प्राणी, यांचे वंशचे वंश निसर्गातून कायमचेच नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत हे वाचवणं आता आपलं कर्तव्य आहे. निसर्गातील कुठल्याही प्रजातीचे प्राणी,पक्षी संकटात सापडले तर त्यांना संकटातून बाहेर काढा अथवा वनविभाग व प्राणी मित्रांना कळवा, माणूस म्हणून हे सत्कर्म करा असे आवाहन प्राणी मित्र नितीन आळकुटे यांनी केले.

===Photopath===

020521\02bed_6_02052021_14.jpg

Web Title: Survival of a rare musk cat found in Kerala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.