अनधिकृत मुरूम उत्खनन प्रकरणी सुशील सोळंकेंना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 12:10 AM2019-06-28T00:10:07+5:302019-06-28T00:11:21+5:30
शहरातील बायपास रोडवरील गोकुळधाम अपार्टमेंट शेजारील सर्व्हे नं. ३८० मधील शासकीय गायरान जमिनीत अनधिकृतपणे मुरूम उत्खनन केल्याप्रकरणी तहसीलदार प्रतिभा गोरे यांनी डॉ.सुशील सोळंके याना दहा लाख रूपयांच्या दंडाची नोटीस दिली.
माजलगाव : शहरातील बायपास रोडवरील गोकुळधाम अपार्टमेंट शेजारील सर्व्हे नं. ३८० मधील शासकीय गायरान जमिनीत अनधिकृतपणे मुरूम उत्खनन केल्याप्रकरणी तहसीलदार प्रतिभा गोरे यांनी डॉ.सुशील सोळंके याना दहा लाख रूपयांच्या दंडाची नोटीस दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, सर्व्हे नं. ३८० मध्ये शासकीय गायरान आहे. शिवाजी चौकापासून सार्वजनिक बांधकाम रोड, बीड रोड, शतायुषी हॉस्पिटल व परिसरात ५१ लोकांनी अतिक्र मण करून शासकीय जमीन बळकावली आहे. सदरील अतिक्र मण धारकांनी सर्व्हे नं. ३६८ मधील खरेदीखत असले तरी प्रत्यक्षात ताबा मात्र महसूल प्रशासनाच्या सर्व्हे नं. ३८० मधील शासकीय गायरानावर घेतल्याचे उघड झाल्याने संबंधित अतिक्र मणधारकांची गाव नमुना नं. १ ई. या अतिक्र मण नोंद वहीत नोंदी करण्यात येवून अतिक्र मण सिध्द करण्यात आले. त्यांचाच भाग म्हणून गोकुळधाम इमारतीची काही जागा अतिक्र मण सिद्ध झालेली आहे. त्याच लगत शासनाच्या जागेत गेल्या दहा-पंधरा दिवसांपासून कोट्यवधीच्या जागेत डॉ.सुशील बन्सीधरराव सोळंके यांनी शासकीय जागेवर बांधकामाच्या उद्देशाने अनाधिकृतपणे मोठ्या प्रमाणात मुरूमाचे उत्खनन सुरू ठेवले होते. ही बाब महसूल प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर मंडळ अधिकारी याच्या अहवालाआधारे सदरील खोदकामाचे मोजमाप करून ३०३ ब्रास मुरूमाचे समोर आले. त्यानूसार प्रती ब्रास ६०५ रूपये रॉयल्टी प्रमाणे १ लाख ८३ हजार ३१५ रूपये प्रमाणे या रक्कमेच्या पाचपट दंडासह १० लाख ९९ हजार ८९० रूपये दंडाची नोटीस डॉ.सुशील बन्सीधरराव सोळंके यांना तहसीलदार प्रतिभा गोरे यांनी बजावत तीन दिवसांत याबाबत खुलासा करण्याचे सुचवले आहे.