चारित्र्यावर संशय; गर्भवती पत्नीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 12:49 AM2019-03-12T00:49:03+5:302019-03-12T00:49:17+5:30

चार महिन्यांची गर्भवती असलेल्या पत्नीचा दारूड्या पतीने चारित्र्यावर संशय घेऊन डोक्यात खोऱ्याच्या दांड्याने मारहाण करून खून केला.

Suspicion of character; Pregnant wife's blood | चारित्र्यावर संशय; गर्भवती पत्नीचा खून

चारित्र्यावर संशय; गर्भवती पत्नीचा खून

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
केज : चार महिन्यांची गर्भवती असलेल्या पत्नीचा दारूड्या पतीने चारित्र्यावर संशय घेऊन डोक्यात खोऱ्याच्या दांड्याने मारहाण करून खून केला. ही खळबळजनक घटना केज तालुक्यातील बनसारोळा येथे रविवारी रात्री घडली. विशेष म्हणजे या दारूड्या पतीने पत्नीच्या बाळंतपणाचे कारण सांगून १०८ रूग्णवाहिकासुध्दा बोलावली. रूग्णवाहिकेतील डॉक्टरांनी तिची तपासणी केल्यावर हा प्रकार समोर आला. पत्नी मयत झाल्याचे समजताच दारूड्या पतीने घटनास्थळावरून पळ काढला.
काजल ज्ञानेश्वर गोरेमाळी (वय २५, रा. बनसारोळा) असे मयत महिलेचे नाव आहे. कळंब तालुक्यातील खामसवाडी मोहा येथील काजलचा विवाह तीन वर्षापुर्वी बनसारोळा येथील ज्ञानेश्वर गोरे याच्यासोबत झाला होता. काजल आणि ज्ञानेश्वरला दोन वर्षाची एक मुलगी आहे.
आता ती दुसऱ्यांदा गर्भवती होती. विवाहानंतर काही दिवस सुखाचे गेले. परंतु नंतर काही दिवसांनी ज्ञानेश्वरला दारूचे व्यसन जडले. नेहमी दारू पिऊन तो काजलला मारहाण करीत असे. रविवारीही तो दारू पिऊन आला. त्याने पत्नीला बेदम मारहाण केली. त्यानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास नळास पाणी आले. काजल पाणी भरत होती. एवढ्यात ज्ञानेश्वरने किरकोळ कारण काढत तिला मारहाण करण्यास सुरूवात केली.
रागाच्या भरात त्याने बाजुलाच पडलेल्या खो-याचा दांडा घेऊन काजलच्या डोक्यात घातला. काजल बेशुद्ध होऊन जागीच ठार झाली.
दरम्यान, खुन केल्यानंतर ज्ञानेश्वरने १०८ क्रमांकावर फोन करून काजलला बाळंतपणासाठी घेऊन जायचे आहे, असे सांगून रु ग्णवाहिका बोलावून घेतली. रु ग्णवाहिका आल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी केली असता काजल मयत असल्याचे दिसले.
डॉक्टरांनी तात्काळ ही माहिती युसूफवडगाव पोलिसांना दिली. पोलिसांनी बनसारोळा येथे धाव घेत पंचनामा करून काजलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बनसारोळ्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवून दिला.
पोलीस उपनिरीक्षक सुनील अंधारे यांच्या फिर्यादीवरून ज्ञानेश्वर विरोधात युसूफवडगाव पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. अंधारे यांनी घटनास्थळावरून दांडा व इतर साहित्य जप्त केले
आहे.
अंबाजोगाईपर्यंत पायी प्रवास
काजलचा खून केल्यानंतर ज्ञानेश्वरने काढता पाय घेतला. वाहनाने गेल्यावर पोलीस पकडतील म्हणून तो वळण रस्त्यांनी पायी चालत अंबाजोगाईला गेला. येथे चुलत भावाकडे थांबला.
त्याला सर्व कहानी सांगितल्याने चुलतभावाने त्याला अंबाजोगाई शहर पोलिसांकडे घेऊन गेला. तेथून युसूफवडगाव पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
विशेष म्हणजे रात्री तो एका ठिकाणी पाईपलाईनच्या खड्ड्यात झोपला आणि सकाळी उठून अंबाजोगाई गाठली.
श्रावणी झाली पोरकी
काजल व ज्ञानेश्वर यांना श्रावणी ही दोन वर्षाची मुलगी आहे. आईचा खून आणि वडिल कारागृहात जाणार असल्याने ती मायेला पोरकी झाली आहे. काजलला आई-वडील नसून ज्ञानेश्वरचे आई-वडीलही वृद्ध आहेत.

Web Title: Suspicion of character; Pregnant wife's blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.