स्वा. सावरकर महाविद्यालयात आत्मार्पण दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:45 AM2021-02-27T04:45:32+5:302021-02-27T04:45:32+5:30
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयातील सावरकरांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात सावरकर अध्यासन केंद्राच्या वतीने घेण्यात आलेल्या ...
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयातील सावरकरांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात सावरकर अध्यासन केंद्राच्या वतीने घेण्यात आलेल्या सावरकर चरित्र प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र वितरण करण्यात आले, तसेच बारावी वर्गातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या 'अनादि मी अनंत मी' या भित्तीपत्रकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर यांनी केले. आपल्या अध्यक्षीय समारोपात सहकार्यवाह प्रा. चंद्रकांत मुळे म्हणाले, सावरकरांचा त्याग, देशभक्ती यातून युवकांनी प्रेरणा घ्यावी. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. ओम प्रकाश झंवर यांनी आभार मानले.
कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. संजय शिरोडकर, मुख्याध्यापक प्रदीप देशमुख, उपप्राचार्य डॉ. राजेश ढेरे, अधीक्षक डॉ. प्रशांत तालखेडकर, महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
===Photopath===
260221\262_bed_27_26022021_14.jpeg
===Caption===
बीड येथील स्वा. सावरकर महविद्यालयात आत्मार्पण दिनानिमित्त स्वा. सावरकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी प्रा. चंद्रकांत मुळे, मिलिंद चिंचपूरकर, प्रमोद कुलकर्णी, प्राचार्य डॉ. संजय शिरोडकर, मुख्याध्यापक प्रदीप देशमुख, उपप्राचार्य डॉ. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर