सामाजिक उपक्रमांनी स्वा. सावरकर जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:25 AM2021-05-29T04:25:21+5:302021-05-29T04:25:21+5:30
अंबाजोगाई : येथील पेशवा युवा व महिला संघटनेच्या वतीने दरवर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांद्वारे अभिवादन करण्यात आले. ...
अंबाजोगाई : येथील पेशवा युवा व महिला संघटनेच्या वतीने दरवर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांद्वारे अभिवादन करण्यात आले. कोरोना पार्श्वभूमीवर सकाळी पेशवा संघटनेच्या वतीने सुरक्षित अंतर पाळत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे स्वातंत्र्य लढ्यातील कार्य अतिशय महत्त्वाचे असून, त्यांचे मातृभूमीचे प्रेम आजही सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत हरिभाऊ माके यांनी व्यक्त केले. सावरकरांचे कार्य आजच्या युवकांनी समजून घ्यायची गरज असून, त्यांचे विचार विविध माध्यमातून पुढे घेऊन जाण्याचे कार्य पेशवा युवा व महिला संघटन करत असल्याची माहिती संकेत तोरंबेकर यांनी दिली.
या कार्यक्रमानंतर शहर पोलीस ठाण्यात पुरुष व महिला कर्मचारी यांना वेगवेगळ्या स्टिमर मशीन व N ९५ मास्कचे वाटप करण्यात आले. हे साहित्य सहाय्यक निरीक्षक कमलाकर गायकवाड यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. तसेच ग्रामीण पोलीस ठाण्यात उत्तरेश्वर केदार, वैजनाथ नागरगोजे, सोनकांबळे, राऊत यांच्या उपस्थितीत साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी राहुल कुलकर्णी, महेश अकोलकर, श्रीकांत जोशी, शिरीष हिरळकर, संकेत तोरंबेकर, वैभव देशपांडे, अक्षय देशमुख, केदार दामोशन, सुमित केजकर, वल्लभ पिंगळे, विशाल देशपांडे, पद्मनाभ देशपांडे, हनुमंत साने, राघव कुलकर्णी, अथर्व कन्नडकर आदी उपस्थित होते.
===Photopath===
280521\avinash mudegaonkar_img-20210528-wa0014_14.jpg