स्वॅब घेणारे गायब, सामान्यांना तासभर प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:04 AM2021-02-06T05:04:00+5:302021-02-06T05:04:00+5:30
बीड : जिल्हा रूग्णालय व आयटीआयमध्ये काेरोना संशयित व्यक्तिंचे स्वॅब घेतले जात आहेत. परंतु जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी तासनतास गायब ...
बीड : जिल्हा रूग्णालय व आयटीआयमध्ये काेरोना संशयित व्यक्तिंचे स्वॅब घेतले जात आहेत. परंतु जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी तासनतास गायब राहत असल्याने स्वॅब देण्यासाठी आलेल्यांना प्रतिक्षा करावी लागत आहे. शिक्षक व सामान्यांची गैरसोय होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात शाळा, महाविद्यालये सुरू करण्यापूर्वी शिक्षकांची कोरोना चाचणी बंधनकारक आहे. ते सध्या जिल्हा रुग्णालयात येऊन चाचणी करीत आहेत. शिक्षकांबरोबरच लक्षणे असलेले व बाधितांच्या संपर्कातील लोकही कोरोना चाचणी करतात. परंतु जिल्हा रुग्णालयात आल्यानंतर येथील कर्मचारी गायब असतात. शुक्रवारी १२ वाजेच्या सुमारासही येथे एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. यामुळे स्वॅब देण्यासाठी आलेल्यांची गैरसोय झाली. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते यांनी भ्रमणध्वणी घेतला नाही. तर विभाग प्रमुख डाॅॅ.जयश्री बांगर म्हणाल्या, येथील कर्मचारी वॉर्डमध्ये गेले असल्याने थोडा उशिर झाला आहे. लवकरच सुरळीत केले जाईल.