‘स्वाभिमानी’चे विमा कंपनीच्या बीड कार्यालयात ठिय्या आंदोलन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 12:18 AM2019-11-26T00:18:10+5:302019-11-26T00:19:15+5:30
जिल्ह्यात हजारो शेतकऱ्यांना अद्याप पीकविमा न मिळाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बीड पक्ष जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांच्या नेतृत्वाखाली २५ नोव्हेंबर रोजी बीड येथील ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयात आक्रमक ठिय्या आंदोलन चालू केले होते.
बीड : २०१८ च्या खरिप हंगामातील अनेक शेतकऱ्यांचा क्षुल्लक त्रुटींमुळे पीकविमा ओरिएण्टल इन्शुरन्स कंपनीकडे थकीत आहे. जिल्ह्यात हजारो शेतकऱ्यांना अद्याप पीकविमा न मिळाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बीड पक्ष जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांच्या नेतृत्वाखाली २५ नोव्हेंबर रोजी बीड येथील ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयात आक्रमक ठिय्या आंदोलन चालू केले होते.
तब्बल ३ तास आंदोलन चालल्याने सदर कार्यालयातील सर्व प्रशासकीय कामकाज खोळंबल्याने लातूर येथील ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीचे विभागीय प्रबंधक आईतवाळे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची दखल घेतली. वंचित व क्षुल्लक त्रुटी असलेल्या शेतकºयांचे विमाप्रस्ताव व इतर कागदपत्रे यांची छाननी चालू असून, त्यांना येत्या १५ ते २० दिवसांत पात्र शेतकºयांना पीकविमा देण्याचा निर्णय देऊन पीकविमा रक्कम वर्ग करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.
या आंदोलनात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव मंडळा चे कॉ. मोहन जाधव, कॉ. सुहास जायभाये यांनी सहभागी होऊन पाठिंबा दिला. सदर आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बीड पक्ष जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, गेवराई ता.अध्यक्ष राजेंद्र डाके पाटील, बीड ता. अध्यक्ष लहू गायकवाड, शेतकरी नेते कमलाकर लांडे, सुधीर कथले, रेवकी सर्कल प्रमुख बळीराम शिंदे,पाचेगाव सर्कल प्रमुख उद्धव साबळे, परमेश्वर वीर, कैलास थोटे, राजेंद्र वीर, विठ्ठल कथले आदी पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.