खड्डे बुजविण्यासाठी स्वाभिमानचे ’झोपा काढो’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 05:01 AM2021-02-18T05:01:36+5:302021-02-18T05:01:36+5:30

बीड शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर पावलोपावली खड्डे झाले आहेत. त्यामुळे सध्या हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या अनेक ...

Swabhiman's 'Zhopa Kadho' movement to fill the pits | खड्डे बुजविण्यासाठी स्वाभिमानचे ’झोपा काढो’ आंदोलन

खड्डे बुजविण्यासाठी स्वाभिमानचे ’झोपा काढो’ आंदोलन

Next

बीड शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर पावलोपावली खड्डे झाले आहेत. त्यामुळे सध्या हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी लहान-मोठे अपघात होऊन वाहनधारक जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबत निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन खड्डे बुजविण्याची मागणी केली होती. परंतु दखल घेण्यात आली नसल्याने सोमवारी जालना रोडवर ‘झोपा काढो’ आंदोलन करण्यात आले. यावेळी बाळासाहेब कदम, भोला जाधव, प्रकाश ससाणे, शेख वसीम, मनोज सरवदे, नितीन डिसले, सुनील खरात, नीलेश वाघमारे, शेख वाजेद, मयूर त्रिभुवन, विकास वायभट, विकी वाव्हळ, अभिजित आव्हाड आदी सहभागी होते. येत्या चार दिवसांत रस्त्यावरील खड्डे बुजवले नाहीत, तर नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करू, असा इशारा प्रा. उबाळे यांनी दिला.

...तर तीव्र आंदोलन करणार : सचिन उबाळे

बीड शहरातील बार्शी रोडवरील राष्ट्रवादी भवनासमोर दुचाकीवरून आजोबांसोबत जाणाऱ्या किमया अमर देशमुख या ९ वर्षीय चिमुकलीचा भरधाव कंटेनरच्या धडकेत मृत्यू झाला. शहरातील मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे अपघाताला कारणीभूत ठरत असून, स्वाभिमान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आजच्या आंदोलनादरम्यान चिमुकल्या किमयाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.

Web Title: Swabhiman's 'Zhopa Kadho' movement to fill the pits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.