स्वामी विवेकानंदांनी मानवजातीला जीवनाकडे पाहण्याचा नवा विचार दिला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:28 AM2021-01-15T04:28:08+5:302021-01-15T04:28:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : येथील संस्कार प्राथमिक विद्यालयामध्ये १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ मासाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : येथील संस्कार प्राथमिक विद्यालयामध्ये १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ मासाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक डी. के. जाधव, सहशिक्षक सुनील सोनवळकर व सहशिक्षिका विद्या खवले यांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सुनील सोनवळकर म्हणाले की, स्वामी विवेकानंद यांनी आपल्या ‘योग’, ‘राजयोग’, आणि ‘ज्ञानयोग’ या ग्रंथाद्वारे समस्त मानवजातीला जीवनाकडे पाहण्याचा नवीन विचार दिला. तसेच सहशिक्षिका खवले ताई यांनी मनोगतामध्ये राजमाता जिजाऊ यांच्या कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी कोविड-१९ पासून संरक्षणासाठी शासनाने आदेशित केलेल्या सर्व नियमांचे पालन करून उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक प्रमुख यू. एस. बर्दापूरकर यांनी केले.