स्वराज्य ध्वजाचे परळीत शिवप्रेमींकडून जोरदार स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:38 AM2021-09-22T04:38:04+5:302021-09-22T04:38:04+5:30
परळी : आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून १५ ऑक्टोबर रोजी खर्डा (ता. जामखेड) येथील प्रसिद्ध शिवपट्टण किल्ल्यावर फडकवण्यात येणाऱ्या ...
परळी : आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून १५ ऑक्टोबर रोजी खर्डा (ता. जामखेड) येथील प्रसिद्ध शिवपट्टण किल्ल्यावर फडकवण्यात येणाऱ्या देशातील सर्वात उंच स्वराज्य ध्वजाचे परळीत बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे व शिवप्रेमींच्यावतीने उत्साहात स्वागत करण्यात आले.
यावेळी क्षेत्रोपाध्याय मंडळींनी मंत्रोपचार करीत विधिवत ध्वज पूजन केले. टाळ-पखवाजाचा निनाद, संबळ, गोंधळी या पारंपरिक वाद्यांत स्वागत केले. येथील वैद्यनाथ मंदिर परिसरात स्वराज्य ध्वजाचे व सोबतच्या चमूचे सुवासिनी महिलांनी औंक्षण केले. विजयाचे प्रतीक असलेला हा देशातील सर्वात उंच ध्वज असून याची उंची ७४ मीटर व वजन ५९० किलो आहे.
यावेळी जि.प.गटनेते अजय मुंडे, नगराध्यक्षा सरोजनी हालगे, पंचायत समिती सभापती बालाजी मुंडे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष बाजीराव धर्माधकारी, शिवसेना तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे, राजेश विभूते, बाळासाहेब देशमुख, अभयकुमार ठक्कर, सूर्यभान मुंडे, माउली गडदे, वैजनाथ सोळंके, गोविंद कराड, संगीता तुपसागर, प्रा. अतुल दुबे, अर्चना रोडे, पल्लवी भोयटे, चित्रा देशपांडे, अन्नपूर्णा जाधव, अय्यूब पठाण, किशोर पारधे, संजय फड, गोविंद मुंडे, बालाजी चाटे, शंकर आडेपवार आदी शिवप्रेमी उपस्थित होते.
210921\img-20210921-wa0485_14.jpg
स्वराज्य ध्वजाचे परळीत शिवप्रेमींकडून जोरदार स्वागत