स्वारातीने एकदिवसीय लसीकरणात गाठला उच्चांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:24 AM2021-07-16T04:24:03+5:302021-07-16T04:24:03+5:30

अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय रुग्णालयातील लसीकरण विभागात १२ जुलै रोजी एका दिवसात ९९१ नागरिकांना ...

Swarati reached its peak in one-day vaccinations | स्वारातीने एकदिवसीय लसीकरणात गाठला उच्चांक

स्वारातीने एकदिवसीय लसीकरणात गाठला उच्चांक

Next

अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय रुग्णालयातील लसीकरण विभागात १२ जुलै रोजी एका दिवसात ९९१ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे आणि लसीकरण विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत दहिरे यांनी दिली.

राज्यात एकीकडे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना राज्य शासनाकडून लसीकरण मोहिमेला वेग देण्यात येत आहे. लसीकरण मोहिमेची अंमलबजावणी सर्वत्र काटेकोरपणे करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. याचीच अंमलबजावणी स्वाराती अंबाजोगाईचा लसीकरण विभागही करीत आहे. १२ जुलै रोजी एका दिवसात ९९१ नागरिकांचे लसीकरण करून आत्तापर्यंतचा एक दिवसीय उच्चांक या विभागाने गाठला आहे.

कोविड -१९ महामारीच्या प्रतिबंधासाठी मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यात कोविड -१९ लसीकरण मोहीम अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. स्वाराती ग्रामीण रुग्णालय व महाविद्यालयातील कोविड लसीकरण विभागाने आतापर्यंत ३० हजार नागरिकांचे लसीकरण केले आहे. यामध्ये प्रामुख्याने आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर , त्याचबरोबर ४५ ते ६० वर्ष आणि १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचा समावेश आहे. लसीकरण मोहिमेत कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लस वापरण्यात आली असून जवळपास दहा हजार नागरिकांनी दुसरा डोस घेऊन स्वतः चे लसीकरण पूर्ण करून घेतले आहे. १२ जुलै रोजी एकदिवसीय लसीकरण मोहिमेचा उच्चांक गाठल्याबद्दल लसीकरण विभागातील विभाग प्रमुख डॉ. प्रशांत दहिरे , डॉ. गणेश ताटे , डॉ. योगेश माने , डॉ. सचिन शेवडे , अजय कसबे , अमरदीप वाघमारे , उदय पाळेकर , पूरण वाड, शेख राजिया , ज्योती जाधव , सुनीता खरात , सुनीता शिराढोणकर , विश्रांती पवार , संध्या साखरे , कोलफुके व सर्व कर्मचाऱ्यांचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे , मेडिसिन विभाग प्रमुख डॉ. सिद्धेश्वर बिराजदार , वैद्यकीय अधीक्षक डॉ. राकेश जाधव, डॉ. विश्वजीत पवार , पीएसएम विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र अंकुशे यांनी कौतुक केले.

-----

१८ ते ४४ तसेच ४५ वर्ष पूर्ण झालेल्या सर्व पुरुष , महिला , गरोदर माता , स्तनदा माता , तसेच दिव्यांग व्यक्तींचे लसीकरण स्वारातीच्या लसीकरण विभागात चालू आहे. सर्व नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लस घेऊन स्वतः ला कोविड-१९ महामारीपासून सुरक्षित ठेवावे. - डॉ. शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता, स्वाराती, अंबाजोगाई.

150721\img-20210715-wa0057.jpg

लसीकरण करणारी टीम

Web Title: Swarati reached its peak in one-day vaccinations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.