३२ वर्षांच्या ग्राहक सेवेतून स्वाती इंटरप्रायजेसने विश्वास दृढ केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:39 AM2021-09-15T04:39:08+5:302021-09-15T04:39:08+5:30

बीड : औरंगाबाद येथे १९८९ साली एका छोट्याशा खोलीमध्ये सुरू केलेला फर्निचरचा व्यवसाय आज स्वाती इंटरप्राईजेस नावाने एका ...

Swati Enterprises builds trust through 32 years of customer service | ३२ वर्षांच्या ग्राहक सेवेतून स्वाती इंटरप्रायजेसने विश्वास दृढ केला

३२ वर्षांच्या ग्राहक सेवेतून स्वाती इंटरप्रायजेसने विश्वास दृढ केला

Next

बीड : औरंगाबाद येथे १९८९ साली एका छोट्याशा खोलीमध्ये सुरू केलेला फर्निचरचा व्यवसाय आज स्वाती इंटरप्राईजेस नावाने एका भव्य फर्निचर मॉलमध्ये रूपांतर होऊन प्रत्येक घरात नावलौकिक मिळवत आहे. त्यांच्या या फर्निचर व्यवसायाने बत्तीस वर्षे ग्राहकसेवा करीत ३३ व्या वर्षांमध्ये यशस्वी पदार्पण केले.

सर्वोत्तम दर्जाचे व सर्व प्रकारचे फर्निचर एकाच छताखाली उपलब्ध असल्यामुळे स्वाती इंटरप्राईजेसमध्ये ग्राहकांचा प्रतिसाद नेहमीच दिसून येतो. घर, गार्डन, हॉटेल, ऑफिस आणि इतर सर्व समारंभासाठी लागणारे सर्व प्रकारचे सुंदर आणि शोभनीय असे फर्निचर उपलब्ध असल्यामुळे स्वाती इंटरप्राईजेस ही ग्राहकांची नेहमीच पहिली पसंती आहे. औरंगाबादच्या चिकलठाणा केंब्रिज चौकाजवळ स्वाती इंटरप्राईजेस बिग फर्निचर मॉल उभारले आहे. तसेच आकाशवाणीमागे जवाहर कॉलनी रोड येथे स्वाती इंटरप्राईजेसची संलग्न फर्म आहे.

ग्राहकांचा विश्वास संपादन केल्यामुळेच बत्तीस वर्षांमध्ये दहा बाय दहाच्या दुकानाचे आज भव्य मॉलमध्ये रूपांतर झाले त्याचे कारण म्हणजे विश्वासाने खरेदी आणि दीर्घ काळ समाधान, उच्च प्रतीचे फर्निचर देऊन पंचवीस वर्षांपूर्वीचा ग्राहक आजसुद्धा समाधानी आहे. ग्राहकांचा विश्वास संपादन केल्यामुळेच आम्ही या व्यवसायामध्ये आज यशस्वी आहोत. ग्राहकांनी एक वेळ येऊन अवश्य भेट द्यावी व येणारे सण आनंदात साजरे करावेत, असे नम्र आवाहन एस. के. मुंदडा यांनी केले आहे.

140921\14_2_bed_17_14092021_14.jpg

स्वाती फर्निचर मॉल

Web Title: Swati Enterprises builds trust through 32 years of customer service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.