घामाने पिकविले ‘मोती’ अन् लॉकडाऊनने केली माती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:41 AM2021-06-09T04:41:47+5:302021-06-09T04:41:47+5:30
पोपट राऊत पाटोदा : पारंपरिक पिके न घेता नवीन काही तरी करण्याची उमेद घेऊन शेती करणारा तालुक्यातील डोंगरकिन्ही ...
पोपट राऊत
पाटोदा : पारंपरिक पिके न घेता नवीन काही तरी करण्याची उमेद घेऊन शेती करणारा तालुक्यातील डोंगरकिन्ही येथील अमोल येवले या तरुणाने आपल्या शेतात दोन एकर क्षेत्रावर कारले लावून नवीन प्रयोग केला. यावर्षी मार्चमध्ये कारले पिकाची लागवड केली. मात्र, कारल्याचे पीक तोडणीसाठी ऐन लॉकडाऊनमध्ये आले. त्यामुळे केलेल्या घामाचे आणि कष्टाची माती झाली. आता लॉकडाऊन शिथील झाले तर हाती पीक नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
मागील दोन वर्षांपासून कोरोना लॉकडाऊनने शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेल्या पिकांवर पाणी फिरले गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागतो. पाटोदा तालुक्यातील डोंगरकिन्ही येथील तरुण शेतकऱ्याने काहीतरी नवीन करावे या ध्येयाने आपल्या शेतामध्ये दोन एकरवर कारले लागवड केली. कारले लागवड करताना बेड तयार करणे, खत भरणे, त्यावर मल्चिंग, त्यानंतर नवीन ठिबक करून ठिबकद्वारे पाणी दिले. बेड भिजल्यानंतर कारल्याच्या बियांचे रोपण करणे, बांबूच्या आणि तारेच्या साह्याने मंडप बांधणे, या सर्व कामासाठी लाखाच्यावर खर्च आला. मागील एक ते दीड महिन्यांपासून कारल्याची तोडणी चालू झाली मात्र बाजारपेठ बंद असल्याने माल विकणेही कठीण होऊन झाले होते. त्यातच कुठे माल विकण्याचा प्रयत्न केला प्रशासनाकडून नियमांचे बंधन, खाकीचा धाक, त्यामुळे माल विकण्यासाठी खूप अडचणी आली. लॉकडाऊनमुळे लाखाच्यावर रुपयांचा नुकसानीचा फटका तरुण शेतकऱ्याला बसला. आता लॉकडाऊन उघडत आहे. उर्वरीत बहारामध्ये तरी झालेला निम्मा अर्धा तरी खर्च निघावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पारंपरिक शेतीला फाटा देत नवीन काहीतरी करावे यामुळे मी वडिलोपार्जित शेतीमध्ये कारले लागवड करण्याचे ठरवले. मार्चमध्ये दोन एकरवर कारल्याची लागवड केली. मात्र, लॉकडाऊन आणि कारल्यावर पडलेल्या व्हायरसमुळे लाखाच्यावर आर्थिक फटका बसला. मागील एक ते दीड महिन्यांपासून माल तोडणीसाठी आला होता. मात्र, लॉकडाऊनमुळे विकला नाही. आता उर्वरित बहारामध्ये कमीत कमी निम्मा अर्धा खर्च तरी निघावा. लॉकडाऊनमुळे हार न मानता नवनवीन प्रयोग शेतीमध्ये राबविण्याचा प्रयत्न करणार आहे
- अमोल येवले, युवा शेतकरी
===Photopath===
080621\08bed_2_08062021_14.jpg~080621\08_2_bed_4_08062021_14.jpg
===Caption===
कारले