बीडमधील प्रकल्प प्रेरणा विभागावर कारवाईची टांगती तलवार; संचालकांकडून चौकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 10:24 AM2021-08-14T10:24:02+5:302021-08-14T12:02:22+5:30

लोकमतचा दणका : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जिल्हा रूग्णालयात प्रकल्प प्रेरणा विभाग कार्यरत आहे.

Sword of action hanging over Prakalp Prerana department in Beed; Inquiry orders from directors | बीडमधील प्रकल्प प्रेरणा विभागावर कारवाईची टांगती तलवार; संचालकांकडून चौकशीचे आदेश

बीडमधील प्रकल्प प्रेरणा विभागावर कारवाईची टांगती तलवार; संचालकांकडून चौकशीचे आदेश

Next
ठळक मुद्देआरोग्य संचालिका डॉ.साधना तायडे यांनी या गंभीर प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. उपसंचालकांना चौकशी करून कारवाईचे आदेश दिले आहेत

- सोमनाथ खताळ
बीड : जिल्हा रूग्णालयातील प्रकल्प प्रेरणा विभागातील गैरप्रकाराची आरोग्य संचालिका डॉ.साधना तायडे यांनी गंभीर दखल घेतली आहे. लातूरचे उपसंचालक डॉ.एकनाथ माले यांना या पूर्ण प्रकाराची चौकशी करून कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार असून धाबे दणाणले आहेत.

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जिल्हा रूग्णालयात प्रकल्प प्रेरणा विभाग कार्यरत आहे. येथे डॉ.सुदाम मोगले या मानसोपचार तज्ज्ञासह चार ते पाच कर्मचारी कार्यरत आहेत. परंतू मागीत तीन वर्षात त्यांनी ३८८ पैकी केवळ५३ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबांना भेट दिली. तसेच समुपदेशन व इतर कारणांच्या नावाखाली वाहनांवर तब्बल १२ लाख ६३ हजार रूपयांची उधळपट्टी केली होती. हा सर्व प्रकार 'लोकमत'ने शुक्रवारी चव्हाट्यावर आणला.त्यानंतर आरोग्य विभागात खळबळ उडाली. राज्याच्य आरोग्य संचालिका डॉ.साधना तायडे यांनी या गंभीर प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच उपसंचालकांना चौकशी करून कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता या विभागातील कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

हेही वाचा - बीड जिल्हा रूग्णालयात रेमडेसिवीरचा काळाबाजार; इंजेक्शन दिले एक अन् नोंद पाचची

विभाग प्रमुखांवर कारवाई
प्रकल्प प्रेरणा विभागाचे प्रमुख मानसोपचार तज्ज्ञ डॉ.सुदाम मोगले आहेत. परंतू ते कायम गायब असतात. दोन दिवसांपासून विनापरवानगी दांडी मारल्याने त्यांच्यावर वेतन कपातीची कारवाईही झाली आहे. यावरून त्यांच्या कामचुकारपणाला दुजाेरा मिळाला आहे. डॉ.मोगले यांच्या स्वाक्षरीनेचे हे१२ लाख रूपये उधळण्यात आल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

मुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यांकडे तक्रार
या सर्व प्रकाराची सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री, आरोग्य आयुक्त, सचिव, संचालक, उपसंचालक या सर्वांकडे नावानिशी तक्रार केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडूनही याची दखल घेऊन संबंधिताला कारवाईच्या सुचना दिल्या आहेत. 

बीडमधील प्रकार गंभीर आहे. या पूर्ण प्रकाराची चौकशी करण्याच्या सुचना उपसंचालक व सीएसला देते. दोषींवर कारवाई केली जाईल.
- डॉ.साधना तायडे, संचालिका, आरोग्य विभाग

बीडमधील प्रकल्प प्रेरणा विभागाबद्दल चौकशीच्या सुचना संचालकांकडून मिळाल्या आहेत. लवकरच कारवाई केली जाईल.
- डॉ.एकनाथ माले, उपसंचालक, लातूर

हेही वाचा - 'लाखो रूपये वेतन घेणारे डॉक्टर पुन्हा गायब'; बीड जिल्हा शल्यचिकित्सकांचा वचक दिसेना

Web Title: Sword of action hanging over Prakalp Prerana department in Beed; Inquiry orders from directors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.