बीडमधील ‘त्या’ कर्मचा-यावर निलंबनाची तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 12:48 AM2018-02-06T00:48:59+5:302018-02-06T00:49:42+5:30

बीड जिल्हा परिषदेच्या कर्मचा-याने नोकरी मिळवून देण्यासाठी रक्कम लाटून फसवणूक केल्याचे प्रकरण बाहेर आल्यानंतर ही बाब जिल्हा परिषद प्रशासनाने गांभिर्याने घेतली आहे. पोलीस विभागाकडे दाखल तक्रार व चौकशीसाठी पोलिसांनी जि. प. शी केलेल्या पत्रव्यवहारामुळे व या प्रकरणाशी संबंध नसताना जि. प. ची बदनामी झाल्याने संबंधित कर्मचा-यावर लवकरच निलंबनाची कारवाई होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. तर हा कर्मचारी गायब झाल्याची चर्चा जि. प. परिसरात ऐकायला मिळाली.

The sword of suspension on 'those' employees in Beed | बीडमधील ‘त्या’ कर्मचा-यावर निलंबनाची तलवार

बीडमधील ‘त्या’ कर्मचा-यावर निलंबनाची तलवार

googlenewsNext
ठळक मुद्देबेरोजगारांची फसवणूक केल्याचे प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्हा परिषदेच्या कर्मचा-याने नोकरी मिळवून देण्यासाठी रक्कम लाटून फसवणूक केल्याचे प्रकरण बाहेर आल्यानंतर ही बाब जिल्हा परिषद प्रशासनाने गांभिर्याने घेतली आहे. पोलीस विभागाकडे दाखल तक्रार व चौकशीसाठी पोलिसांनी जि. प. शी केलेल्या पत्रव्यवहारामुळे व या प्रकरणाशी संबंध नसताना जि. प. ची बदनामी झाल्याने संबंधित कर्मचा-यावर लवकरच निलंबनाची कारवाई होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. तर हा कर्मचारी गायब झाल्याची चर्चा जि. प. परिसरात ऐकायला मिळाली.

जिल्हा परिषदेतील सांख्यिकी विभागातील जगताप नामक विस्तार अधिकाºयाने नोकरी मिळवून देतो म्हणून नगर जिल्ह्यातील चार जणांकडून पैसे उकळून बनावट आॅर्डर दिल्याची तक्रार पोलीस विभागाकडे नोव्हेंबरमध्ये केली होती. या संदर्भात चौकशीच्या अनुषंगाने पोलीस विभागाने १७ नोव्हेंबर रोजी जगताप यास हजर करण्याबाबत जि. प. ला पत्र दिले होते.

जगताप सध्या आरोग्य विभागात तांत्रिक पदावर कार्यरत आहे. त्याला चौकशीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर राहण्याबाबत कळविले होते. परंतु, निवडणुकीचे कारण सांगून तो हजर राहिला नाही. दरम्यान तक्रारकर्त्यांनी उपोषणासाठी परवनगी मागितल्यानंतर या प्रकाराची वाच्यता झाली.


कारवाई सुरू आहे
वास्तविक पाहता हा प्रकार बीड जिल्हा परिषदेत झालेला नाही. जि.प. मध्ये कोणतीही भरती सुरु नाही तसेच हा कर्मचारी अस्थापना विभागात नाही असे जि. प. च्या सुत्रांनी सांगितले.
दरम्यान, पोलीस विभागाकडून झालेला पत्रव्यवहार, कर्मचाºयाच्या वर्तनामुळे जि. प. ची प्रतिमा मलीन होणे आदी कारणांमुळे या कर्मचाºयावर कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यता आहे. या संदर्भात कार्यवाही सुरु असल्याचे सुत्रांनी सांगितले.

Web Title: The sword of suspension on 'those' employees in Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.