माजलगावात शेतक-याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 12:56 AM2017-11-18T00:56:31+5:302017-11-18T00:57:13+5:30
पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर मराठवाड्यात साखर कारखान्यांनी उसाला भाव द्यावा, यासह विविध मागण्यांसाठी ऊसदरासाठी मारलेल्या शेतक-याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा शुक्रवारी माजलगाव येथे काढण्यात आली.
माजलगाव : पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर मराठवाड्यात साखर कारखान्यांनी उसाला भाव द्यावा, यासह विविध मागण्यांसाठी ऊसदरासाठी मारलेल्या शेतक-याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा शुक्रवारी माजलगाव येथे काढण्यात आली. शेतकरी संघर्ष समितीने आंदोलनासाठी आक्रमक पवित्रा घेतला होता.
जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी बैठक घेऊन ऊसाचा समानदर देऊन २६५ जातीच्या उसाची नोंद न घेणे, माजलगाव, धारुर तालुक्यातील दोन्ही सहकारी साखर कारखान्यांनी खाजगी साखर कारखान्यांपेक्षा गतवर्षी प्रतिटन ६०० रुपये कमी दराने रक्कम दिलेली आहे ती रक्कम देण्यात यावी, २६५ जातीच्या उसाची नोंद घ्यावी या मागणीसाठी हे आंदोलन झाले.
शेतकरी संघर्ष समितीचे गंगाभीषण थावरे, प्रा. एस. ए. सत्तार, जकिरोद्दीन इनामदार, सलीम चाउस, अंगद थावरे, महादेव थावरे, माणिक थावरे, अशोक नरवडे, बाबासाहेब मस्के, उल्हास आनंदगावकर, केशव थावरे व शेतकरी सहभागी झाले होते.