रस्त्यावरुन ओढले रेल्वेचे प्रतीकात्मक इंजिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:38 AM2021-08-21T04:38:07+5:302021-08-21T04:38:07+5:30

बीड : रेल्वेकडे डोळे लावून बसलेल्या बीडकरांनी २० ऑगस्ट रोजी जिल्हावासीयांच्या अस्मितेच्या नगर-बीड- परळी रेल्वेमार्गाचे काम रखडल्याने प्रशासनाने लक्ष ...

The symbolic engine of a train pulled off the road | रस्त्यावरुन ओढले रेल्वेचे प्रतीकात्मक इंजिन

रस्त्यावरुन ओढले रेल्वेचे प्रतीकात्मक इंजिन

Next

बीड :

रेल्वेकडे डोळे लावून बसलेल्या बीडकरांनी २० ऑगस्ट रोजी

जिल्हावासीयांच्या अस्मितेच्या नगर-बीड- परळी रेल्वेमार्गाचे काम रखडल्याने प्रशासनाने लक्ष वेधण्यासाठी २० ऑगस्ट रोजी शहरातून रेल्वेचे प्रतीकात्मक इंजिन ओढत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेण्यात आले. रखडलेला रेल्वेप्रश्न रुळावर आणण्यासाठी चक्क रस्त्यावरुन इंजिन ढकलण्यात आले. या आंदोलनात सर्वपक्षीय पदाधिकारी सहभागी होते.

या स्थळापर्यंत ओढत घेऊन जाऊन प्रतीकात्मक रेल्वेचे उद्घाटन करण्यासाठी सेल्फी स्टॅन्ड ठेवण्यात आले. या अनोख्या आंदोलनाची बीडमध्ये चर्चा झाली.

जिल्ह्यातील जनतेच्या जिव्हाळ्याच्या रेल्वेप्रश्नावर आजपर्यंत अनेकदा आंदोलने झाली. अनेक वर्षांपासून अनेक आंदोलने झाली, परंतु सरकार व राजकीय इच्छाशक्ती नसलेले लोकप्रतिनिधी व आडमुठे प्रशासन यांच्यामुळे नगर-बीड-परळी या रेल्वेमार्गास उशीर झाला. रेल्वे मार्गासाठी राज्याने ५० टक्के व केंद्राने ५० टक्के वाटा उचलला. मात्र, प्रत्येकवेळी निराशाच झाली. प्रशासन व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थी युवा रेल्वे कृती समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून रेल्वेचे प्रतीकात्मक इंजिन ओढत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेले. यावेळी

कृती समितीचे अध्यक्ष जयप्रकाश आघाव, उपाध्यक्ष ॲड.गणेश करांडे, सचिव संगमेश्वर आंधळकर, ॲड.अंबादास आगे, मोहन जाधव, ॲड.शैलेश जाधव, नगरसेवक युवराज जगताप, राजेश शिंदे, गणेश मस्के, ॲड.महेश धांडे, राजेंद्र नाईकवाडे,मळीराम यादव, जोतीराम हुरकुडे,चेतन पोर्कणा, ॲड.शफिक शेख,बाबू लव्हाळे आदी सहभागी झाले होते. यावेळी घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी रेल्वेमार्गाचे प्रतीकात्मक उद्घाटन करण्यात आले. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात होता.

...

रेल्वेचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित ठेवल्याने विकास खुंटला. या प्रश्नावर अनेक वर्षे राजकारण झाले.अनेकांनी सोयीपुरता हा प्रश्न हाताळला, पण जिल्हावासीयांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे प्रतीकात्मक आंदोलन करुन लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

- संगमेश्वर आंधळकर, आंदोलक

...

नगर-बीड- परळी रेल्वेसाठी आजपर्यंत अनेक आंदोलने झाली; मात्र प्रत्येकवेळी केवळ आश्वासने देण्यात आली. खुद्द पंतप्रधानांनी बीडमध्ये झालेल्या सभेत रेल्वेचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले;मात्र अजूनही या कामास गती मिळाली नाही.

- ॲड.शैलेश जाधव, आंदोलक

....

Web Title: The symbolic engine of a train pulled off the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.