गुटखा विक्रीकडे यंत्रणेचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:37 AM2021-02-20T05:37:57+5:302021-02-20T05:37:57+5:30
वीज सुरळीत मिळेना; नागरिकांत संताप बीड : वडवणी तालुक्यातील चिंचोटी, साळिंबा, कुप्पा, देवडी, चिंचाळा, उपळी आदी गावांतील वीजपुरवठा ...
वीज सुरळीत मिळेना; नागरिकांत संताप
बीड : वडवणी तालुक्यातील चिंचोटी, साळिंबा, कुप्पा, देवडी, चिंचाळा, उपळी आदी गावांतील वीजपुरवठा सुरळीत सुरू नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. तासन्तास वीज गायब राहत आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र संताप आहे.
‘त्या’ वाहनधारकांवर कारवाईची मागणी
माजलगाव : येथील तालुका रुग्णालय परिसरात वाहनचालक कर्णकर्कश हॉर्न वाजवीत असल्याने रुग्णांसह सर्वसामान्यांना त्याचा त्रास होत आहे. अनेकवेळा वाहनधारक नागरिकांच्या जवळ येऊन मोठे हॉर्न वाजवत असल्याने नागरिक मोठ्या आवाजाने दचकत आहेत. या वाहनचालकांवर कारवाईची मागणी आहे.
बाजारतळ स्वच्छ करा
बीड : तालुक्यातील चौसाळा येथील बाजारतळ, तसेच बाजारपेठेत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायतीकडे स्वच्छतेची मागणी करूनदेखील स्वच्छता केली जात नाही. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे.
हायवेचे काम होईना
नेकनूर : बीड तालुक्यातील नेकनूर मार्गे मांजरसुंबा ते केज या राज्य महामार्गाचे काम अनेक ठिकाणी अपूर्ण आहे. त्यामुळे वाहनचालकांची मोठी गैरसोय होत असून, अनेकवेळा महामार्गावरील अपूर्ण कामे पूर्ण करण्यासंदर्भात नागरिकांनी मागणी केली आहे.
पर्यावरणाला फटका
माजलगाव : तालुक्यातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत आहे. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत आहे. प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा फटका पर्यावरणाला बसत असल्याचे चित्र गोदाकाठच्या नदी पात्रांमध्ये दिसत आहे. याबाबत लक्ष देण्याची मागणी गोदावरी काठच्या गावातून होत आहे
हरणांचा उपद्रव
अंबाजोगाई : तालुक्यातील आपेगाव परिसरात समाधानकारक पावसामुळे पिके बहरली. मात्र हरणांच्या कळपाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. यामुळे पिकाला फटका बसत आहे. हरीण, काळविटाचा कळप १० ते ५० च्या संख्येने असतो. हे कळप पिके फस्त करीत आहेत.