तहसीलदारांनी केली वाळू माफियांविरुद्ध कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 12:04 AM2019-06-01T00:04:19+5:302019-06-01T00:06:00+5:30
तालुक्यातील गोदापात्रातून अवैधरित्या उपसा करुन वाळूची चोरटी वाहतूक करणारे दोन वाहन पकडून तहासीलदारांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. दोन्ही वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून तशी नोटीस बजावण्यात आली आहे.
माजलगाव : तालुक्यातील गोदापात्रातून अवैधरित्या उपसा करुन वाळूची चोरटी वाहतूक करणारे दोन वाहन पकडून तहासीलदारांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. दोन्ही वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून तशी नोटीस बजावण्यात आली आहे.
माजलगाव तालुक्यातील गोदावरी पात्रातून शेकडो ब्रास वाळूचा उपसा करुन चोरटी वाहतूक केली जाते. तालुक्यातील मंजरथ गोदापात्रातून वाळूची चोरी करुन तालुक्यातील देपेगाव-सांडसचिंचोली शिवारातून वाळूची वाहतूक करण्यात येत होती. ही माहिती तहसीलदार प्रतिभा गोरे यांना मिळाली. त्यानुसार तहसीलदार गोरे व त्यांच्या पथकाने वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला जागीच पकडले. विनानंबरच्या या टॅक्टरमध्ये एक ब्रास वाळू असल्याचे आढळून आले. संबंधित मालकाला १ लाख २७ हजार रुपये दंडाची नोटीस बजावली.
तर शहरातील भाटवडगाव शिवारात अवैध वाळू उपसा करून त्याची चोरी करून जाणाºया हायवाचा (क्र . एम .एच १४ बी जे १५५५) पाठलाग करत तहसीलदारांनी पकडले. हायवा मालक अमजद मकसुद खान यांच्या या वाहनात ४.३६ ब्रास अवैध वाळू आढळून आली. त्यांना २ लाख १९ हजार रु पये दंडाची नोटीस बजावली आहे.
तहसीलदार गोरे यांच्यासह कारवाईत वाळू दक्षता पथक प्रमुख तथा मंडळअधिकारी विकास टाकणखार, तलाठी सोपानराव वाघमारे, मिलमिले यांनी कारवाई केली. या कारवाईमुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले असून, कारवाईची धास्तीचे घेतल्याचे चित्र आहे.
शिरुरमध्ये एका रात्रीतवाळूचे ३ ट्रॅक्टर जप्त
शिरुर : तालुक्यातील कमळेश्वर धानोरा येथील सिंदफना नदीपात्रात प्रभारी तहसीलदार किशोर सानप यांच्या पथकाने अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली असून उत्खनन आणि वाहतूक करताना तीन ट्रॅक्टर पकडले आहेत.
ही कारवाई मंडळ अधिकारी सुरेश पाळवदे,तलाठी,शरद शिंदे, वाहन चालक अमोल रणखांब, अभिमन्यू गाडेकर यांनी केली. ही वाहने तुकाराम आरसुळ यांची असून पुढील दंडात्मक कारवाईसाठी जप्त करण्यात आली आहेत. दोन दिवसांपूर्वी केलेल्या कारवाईत एक लक्ष सत्तावीस हजार रु पयांचा दंड आकारण्यात आला होता.