नगराध्यक्षांसह अधिकाऱ्यांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 12:31 AM2019-01-18T00:31:24+5:302019-01-18T00:32:11+5:30

१५४ कोटी रुपयांच्या भुयारी गटार योजनेचे काम सुरू करण्याचे आदेश असतानाही मागील सहा महिन्यांपासून ते रखडलेले आहे. नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर आणि पालिका अधिकारी, पदाधिका-यांकडून केवळ उद्घाटनाचा घाट घालण्यासाठी हे काम अद्याप सुरू केले नाही. त्यामुळे यात नगराध्यक्षासह इतर दोषींवर कारवाई करावी आणि हे काम तात्काळ सुरू करावे, या मागणीसाठी काकू-नाना आघाडीच्या वतीने गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले.

Take action against the officers of the municipal corporation | नगराध्यक्षांसह अधिकाऱ्यांवर कारवाई करा

नगराध्यक्षांसह अधिकाऱ्यांवर कारवाई करा

googlenewsNext
ठळक मुद्देकाकू-नाना आघाडीचे उपोषण : भुयारी गटार योजना कामात दिरंगाईचा आरोप

बीड : १५४ कोटी रुपयांच्या भुयारी गटार योजनेचे काम सुरू करण्याचे आदेश असतानाही मागील सहा महिन्यांपासून ते रखडलेले आहे. नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर आणि पालिका अधिकारी, पदाधिका-यांकडून केवळ उद्घाटनाचा घाट घालण्यासाठी हे काम अद्याप सुरू केले नाही. त्यामुळे यात नगराध्यक्षासह इतर दोषींवर कारवाई करावी आणि हे काम तात्काळ सुरू करावे, या मागणीसाठी काकू-नाना आघाडीच्या वतीने गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले.
केंद्र शासन पुरस्कृत अभियानांतर्गत बीड शहरासाठी भुयारी गटार योजना मंजूर करण्यात आलेली आहे. यासाठी १५४ कोटी ९४ लाख ३४७ रुपयांचा निधी आहे. महाराष्ट्र जीवन प्रधिकरणने हे काम एका एजन्सीला दिलेले आहे. मात्र सहा महिने उलटूनही अद्याप या योजनेच्या कामाला सुरूवात झालेली नाही. काम सुरू करण्यासाठी मजिप्र.चे अभियंता भांबरे यांनी मुख्याधिकारी, नगराध्यक्षांना पत्र पाठविलेले आहे. मात्र नगराध्यक्षांकडून नारळ फोडून श्रेय लाटण्यासाठी हे काम थांबविले आहे. स्वच्छता व आरोग्याच्या दृष्टीने ही योजना महत्वाची असतानाही केवळ नारळ फोडून श्रेय लाटण्यासाठी नगराध्यक्ष शहरवासियांना वेठीस धरत असल्याचा आरोप जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात केला आहे. संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आ. राजेंद्र जगताप, उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, फारूक पटेल, अमर नाईकवाडे, भैय्यासाहेब मोरे, रणजीत बनसोडे, प्रभाकर पोपळे, शेख आमेर, बिभीषण लांडगे आदी उपोषणात सहभागी झाले होते.

Web Title: Take action against the officers of the municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.