शासनाच्या कल्याणकारी योजनेचा लाभ घ्यावा- प्राची कुलकर्णी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 12:12 AM2018-01-31T00:12:57+5:302018-01-31T00:14:17+5:30
बीड : शासन नागरिकांसाठी अनेकविध कल्याणकारी योजना राबवित आहे. या योजनांच्या लाभासाठी या महाशिबीरामध्ये उभारण्यात आलेल्या सर्व विभागाच्या स्टॉलवर ...
बीड : शासन नागरिकांसाठी अनेकविध कल्याणकारी योजना राबवित आहे. या योजनांच्या लाभासाठी या महाशिबीरामध्ये उभारण्यात आलेल्या सर्व विभागाच्या स्टॉलवर नागरिकांनी योजनांची माहिती घ्यावी व योजनेस पात्र लाभार्थ्यांनी आपल्या नावाची नोंदणी करुन शासकीय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बीड जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश प्राची प्र. कुलकर्णी यांनी वडगाव गुंदा येथे आयोजित महाशिबीरात केले.
बीड तालुक्यातील वडगाव गुंदा येथे बीड जिल्हा विधीसेवा प्राधिकारणाच्यावतीने महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकारणाचे सदस्य सचिव डी.एन. खडसे, जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला, जिल्हा सरकारी वकील अॅड.अजय राख, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड.प्रवीण राख, जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाच्या अधिक्षिका उषा रुपदे, सरपंच पंचशिला डोंगरदिवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड.नितीन वाघमारे यांनी केले. या कार्यक्रमास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिसन पवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संगिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वासनिक, डॉ.सुनील भोकरे, उदयसिंह सोळंके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सतिष हारिदास, उपसरपंच महादेव नागरगोजे, सचिन डोंगरदिवे, अभिमान डोंगरदिवे, अंकुश डोंगरदिवे, द्रोपदी नागरगोजे, सरस्वती लांब, बाबासाहेब नागरगोजे, कमलाबाई नागरगोजे, दादाहरी नागरगोजे, महादेव खेडकर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी परिसरातील नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी एम. डी. सिंह म्हणाले की, नागरिकांना येणाºया अडचणी सोडविण्यासाठी ग्रामस्तरावर नेमण्यात आलेल्या अधिकाºयांची मदत घेतली पाहिजे. गावात निर्माण झालेल्या समस्या सोडविण्यासाठी दरमहा ग्रामसभा घेवून त्या सोडविल्या पाहिजेत, असे सांगितले.
पोलीस अधीक्षक जी.श्रीधर म्हणाले की, शासन योजनांचा लाभ घ्यावा. प्रत्येक नागरिकांनी कोणतेही काम करताना कायदयाचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे, असे सांगितले. इतर मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले.