कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांची काळजी घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:32 AM2021-05-23T04:32:44+5:302021-05-23T04:32:44+5:30
जिल्हाधिकारी : बालकांच्या जिल्हा टास्क फोर्सचा आढावा बीड : कोविड- १९ आपत्तीमध्ये बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी जिल्हा स्तरावर स्थापन ...
जिल्हाधिकारी : बालकांच्या जिल्हा टास्क फोर्सचा आढावा
बीड : कोविड- १९ आपत्तीमध्ये बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या कृती दलाची जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. अनाथ झालेल्या बालकांच्या कायदेशीर हक्क व आवश्यक न्यायिक विषयक मदत त्यांना मिळावी यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत कार्यवाही केली जावी तसेच त्यांची काळजी व संरक्षणासाठी पोलीस विभागास सूचना यावेळी देण्यात आल्या.
कोविड-१९ या साथ रोगाच्या आपत्तीमध्ये बाधित व्यक्तींचे मृत्यू होत असून यामध्ये दोन्ही पालकांचे निधन झाल्याने अनाथ झालेल्या मुलांची काळजी घेणे गरजेचे असून यासाठी शासनाने निर्देश दिले आहेत. दोन्ही पालक कोविड आजाराने गमावल्यामुळे अनाथ झाले आहे आणि त्यास सांभाळण्यासाठी जवळचे कोणीही नातेवाईक नाहीत, असे बालक असल्यास त्याबाबतची माहिती बाल न्याय समितीला कळविण्यात यावी अथवा १०९८ या टोल फ्री क्रमांकद्वारे कोरोना आपत्तीमुळे अनाथ झालेल्या बालकांची माहिती नागरिक कळवू शकतात, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी व्ही. एम. हुंडेकर, चाइल्ड लाइन समन्वयक रामहरी जाधव, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (बालकल्याण) रामेश्वर मुंडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी. के. पिंगळे, प्रकल्प संचालक बालकामगार ओमप्रकाश गिरी, बाल कल्याण समितीचे डॉ. अभय वनवे, तत्त्वशील कांबळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी एस. एस. निर्मळ आदी उपस्थित होते.
टास्क फोर्समध्ये यांचा समावेश
जिल्ह्यातील अशा पीडित पालकांची काळजी व संरक्षणाचे काम करणाऱ्या संस्थांमध्ये या बालकांना यथायोग्य संगोपन होण्यासाठी जिल्हास्तरावरील सदर कृती दल टास्क फोर्स काम करणार आहे. या टास्क फोर्समध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बाल कल्याण समिती, पोलीस विभाग, नगरपालिका, जिल्हा आरोग्य विभाग, महिला व बाल विकास विभाग तसेच निमंत्रित सदस्य यांचा समावेश करण्यात आला आहे.
८ बालगृहे जिल्ह्यात सद्य:स्थितीत
१ बालगृह एचआयव्हीग्रस्त बालकांसाठी
१६९ बालके सध्या सर्व बालगृहांमध्ये
४५० बालकांना बाल संगोपन योजनेतून आर्थिक मदत
---------------
===Photopath===
220521\22_2_bed_1_22052021_14.jpg
===Caption===
बालकांसाठी टास्क फोर्सची बैठक