मुक्या जनावरांची काळजी घ्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:22 AM2021-07-09T04:22:11+5:302021-07-09T04:22:11+5:30
धोकादायक पुलाला कठडे बसवावेत वडवणी : तालुक्यात अनेक नदी, नाल्यांवर पुलांचे बांधकाम झाले आहे. मात्र, पुलाला संरक्षण कठडे नसल्याने ...
धोकादायक पुलाला कठडे बसवावेत
वडवणी : तालुक्यात अनेक नदी, नाल्यांवर पुलांचे बांधकाम झाले आहे. मात्र, पुलाला संरक्षण कठडे नसल्याने अपघात घडण्याची शक्यता असते. त्यामुळे या पुलांवर कठडे लावण्याची मागणी होत आहे. विशेष म्हणजे, वडवणी कवडगाव रस्त्यावर खड्डे पडले असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मुख्य रस्त्यावर मामला तलावनजीक जुना पूल धोकादायक बनला असून, पुलाचे कठडे तुटले आहेत. तसेच ग्रामीण भागातील नदी, नाल्यांवर संरक्षक कठडे तुटले असून, काही चोरीलाही गेले आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन नव्याने कठडे बांधावेत, अशी मागणी ओमराजे जाधव यांनी यांनी केली आहे.
बाजारात गर्दी; सामाजिक अंतर दिसेना
वडवणी : खरीप हंगामातील पेरण्या झाल्या आहेत. पिकांची उगवण झाली आहे. शेतकरी तयारीला लागले असून, शेतकरी कृषी दुकानात गर्दी करीत असून कापूस, सोयाबीन, तूर, मूग, या पिकांच्या खत खरेदीसाठी ते गर्दी करीत आहेत. यामुळे सामाजिक अंतराचा फज्जा उडाला आहे.
वाळलेले वृक्ष बनले धोकादायक
वडवणी : तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांना जोडल्या जाणाऱ्या रस्त्याने दोन्ही बाजूला जुने वृक्ष मोठ्या प्रमाणात आहेत. ही वृक्ष वाळलेले असल्याने जोरदार वारा सुटला की धोकादायक बनले आहेत. त्यामुळे मामला तलावाच्या काठावरील वाळलेले जुने वृक्ष काढण्याची गरज आहे.
नाली सफाई कामे रखडली
बीड : शहरातील मुख्य रस्त्याच्या व पोलीस ठाण्याच्या मागच्या प्रभागात नाली सफाई कामे रखडली असल्याने या भागात दुर्गंधी पसरली आहे. ठिकठिकाणी नाली बुजली गेल्याने दुर्गंधीचे पाणी रस्त्यावर उतरले असल्याने परिसरात नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते आहे. तत्काळ नाल्या साफ करून दुर्गंधी हटविण्याची मागणी होत आहे.
रोहित्र बनले धोकादायक
माजलगाव : शहरातील तसेच ग्रामीण भागातील गावांना वीज पुरवठा करणाऱ्या विद्युत वाहिण्या व रोहिञ उघडे असल्याने धोकादायक बनले आहेत. रोहिञाचे दरवाजे नसल्याने केबल हे जमिनीवर पसरले आहे. पावसाळ्यापूर्वी महावितरणने स्वच्छता मोहीम करणे आवश्यक बनले आहे.
उकाड्यामुळे नागरिक त्रस्त
बीड : दोन दिवसांपासून तालुक्यात कधी ढगाळ वातावरण, तर कधी कडक ऊन यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकांनी कुलर, पंख्यांचा आधार घेत उकाड्यापासून सुटका करून घेतली. चार दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने वातावरणात बदल झाला आहे.