कोविड सेंटरमध्ये सुविधांबाबत दक्षता घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:12 AM2021-09-02T05:12:23+5:302021-09-02T05:12:23+5:30
वडवणी : कोरोनाच्या काळात आरोग्य विभागाने भरती केलेल्या बहुतांश कंत्राटी कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केले आहे. त्यामुळे, कोविड सेंटर ...
वडवणी : कोरोनाच्या काळात आरोग्य विभागाने भरती केलेल्या बहुतांश कंत्राटी कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केले आहे. त्यामुळे, कोविड सेंटर व इतर कामांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत कंत्राटी कर्मचारी कपात केल्याने नियमित आरोग्य कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येणार आहे. त्यामुळे कोविड सेंटरमधील रूग्णांची गैरसोय होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य आधिकारी डाॅ. रौफ शेख यांनी दिल्या. बुधवारी येथील कोविड सेंटरला भेट दिली. कोविड सेंटरची पाहणी करून स्वच्छता ,जेवण ,मुलभूत सुविधांचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार कोविड सेंटरमध्ये नियमित आरोग्य आधिकारी, कर्मचाऱ्यांमार्फत काम करून घेण्याबाबत जिल्हा आरोग्य आधिकारी डाॅ. शेख यांनी सूचना केल्या. यावेळी तालुका आरोग्य आधिकारी डाॅ. ज्ञानेश्वर निपटे, तालुका लेखापाल शाम थोटे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ नारायण पवार तसेच कर्मचारी उपस्थित होते.
010921\20210901_141253.jpg
जिल्हा आरोग्य आधिकारी डाॅ रौफ यांनी घेतला कोवीड सेंटर चा आढावा