स्वराज्यनगर, शाहूनगरसह १० ठिकाणी दुचाकी सांभाळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:37 AM2021-09-22T04:37:05+5:302021-09-22T04:37:05+5:30

गुन्हेगारी वाढली: रात्रीच्यावेळी सर्वाधिक दुचाकीचोरी बीड : जिल्ह्यात वाहनचोरांचा धुडगूस सुरूच आहे. शहरातील शिवाजीनगर ठाणे हद्दीतील स्वराज्यनगर व शाहूनगर ...

Take care of two-wheelers at 10 places including Swarajyanagar and Shahunagar! | स्वराज्यनगर, शाहूनगरसह १० ठिकाणी दुचाकी सांभाळा !

स्वराज्यनगर, शाहूनगरसह १० ठिकाणी दुचाकी सांभाळा !

Next

गुन्हेगारी वाढली: रात्रीच्यावेळी सर्वाधिक दुचाकीचोरी

बीड : जिल्ह्यात वाहनचोरांचा धुडगूस सुरूच आहे. शहरातील शिवाजीनगर ठाणे हद्दीतील स्वराज्यनगर व शाहूनगर येथून सर्वात जास्त दुचाकी चोरीस गेल्याचे समोर आले आहे. रात्रीच्यावेळी दुचाकी चोरीचे प्रमाण अधिक आहे. बेफिकीर नागरिक व पार्किंगचा प्रश्न यामुळे दुचाकी चोरांना वाहनमालक निमंत्रण देतात की काय, असेच चित्र आहे.

रस्त्यावर कोठेही सहज दुचाकी उभ्या असतात. चोरी करून पळून जाणे सोपे असते शिवाय गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक व्यक्तींची गरज भासत नाही. त्यामुळे दुचाकीचोरीला गुन्हेगारांकडून प्राधान्य दिले जाते. दुचाकींच्या वाढत्या किमतीमुळे जुन्या दुचाकींनाही मागणी आहे. अनेक दुचाकींचा स्वीच खराब असतो. त्यामुळे ती सहजासहजी पळविता येऊ शकते. दुचाकीचोरीचे वाढते प्रमाण चिंताजनक असून पोलिसांपुढे आव्हान कायम आहे.

...

आकडे काय सांगतात?

.... या भागात सर्वाधिक धोका !

नगर रोड : शहरातील नगर रोडवर न्यायालय, तहसील, जिल्हाधिकारी कार्यालय, दस्त नोंदणी कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, बँका, शिकवणी वर्ग आहेत. दुचाकी रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असतात. त्यामुळे चोरांना सोयीचे होते.

सुभाष रोड : सुभाष रोडवर शहरातील मुख्य बाजारपेठ आहे. त्याला जोडून स्टेडियम कॉम्प्लेक्स, भाजी मंडई, माळीवेस, धोंडीपुरा, कबाडगल्ली आदी रस्ते आहेत. दाटीवाटीने वाहने रस्त्यावर उभी असतात, याचा चोरटे गैरफायदा घेऊ शकतात.

जालना रोड : शहरातील जालना रोडवर रुग्णालये, मोठमोठी हॉटेल्स, व्यापारी संकुले आहेत. त्यामुळे हा रस्ता गजबजलेला असतो. येथेही रस्त्यावर दुचाकी उभी करून इतरत्र जाणे धोक्याचे ठरू शकते. दुचाकी चोरीस जाण्याची शक्यता असते.

बसस्थानक : शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाच्या मागील रस्त्यावर तसेच समोरून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर वाहनांची तोबा गर्दी असते. शिवाय दुचाकी थेट बसस्थानकातही आणून उभी करतात. दुचाकीचोरांचा येथे मुक्तवावर असतो.

.....

आतापर्यंत केवळ ... दुचाकी सापडल्या

....

वाहनांच्या सुरक्षेसाठी नागरिकांनी खबरदारी घेतली पाहिजे. रस्त्यावर वाहने उभी न करता सुरक्षित सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगरानीत ती लावावीत. चाकांसह दुचाकीला साखळीने कुलूपबंद करावे. शक्य असल्यास जीपीएस लावावे.

- सतीश वाघ, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, बीड

....

सराईत गुन्हेगारांची वेळोवेळी झाडाझडती

दुचाकीचोरीचे गुन्हे करणाऱ्या काही विशिष्ट टोळ्या जिल्ह्यात आहेत. शिवाय काही गुन्हेगार असे गुन्हे वारंवार करताना आढळून आले आहेत. अशा सराईत आरोपींवर पोलिसांचा हमखास वॉच असतो. वेळोवेळी त्यांची झाडाझडती घेतली जाते.

....

Web Title: Take care of two-wheelers at 10 places including Swarajyanagar and Shahunagar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.