परळीतील बोगस कामे व बंद सूतगिरणीचे श्रेय घ्या - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:34 AM2021-04-04T04:34:36+5:302021-04-04T04:34:36+5:30
परळी : भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व जिल्ह्याच्या खासदार प्रितम मुंडे यांच्या प्रयत्नामुळे व पाठपुराव्यामुळे परळी-गंगाखेड ...
परळी : भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व जिल्ह्याच्या खासदार प्रितम मुंडे यांच्या प्रयत्नामुळे व पाठपुराव्यामुळे परळी-गंगाखेड रस्त्यासाठी २२४ कोटींचा निधी, बीड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासाठी ५६ कोटींचा निधी, केंद्रीय रस्ते निधी अंतर्गत जिल्ह्यातील सात रस्त्यांसाठी ७५ कोटींचा निधी मंजूर झाला. पण याचे फुकटचे श्रेय पालकमंत्री घेऊ पाहत आहेत. मुंडे भगिनींच्या कामाचे श्रेय घेण्यापेक्षा परळी शहरातील बोगस काम, बंद पाडलेल्या सूतगिरणीचे व अवैध वाळू ऊपशाचे श्रेय घ्या, अशी टीका भाजपा किसान मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य उत्तम राव माने यांनी केली आहे.
परळी तालुक्यातील चाललेली बोगस कामे, तरुणाच्या हाताला काम मिळवून देणारी सूतगिरणी बंद पाडली. दिवसा ढवळ्या होत असलेला गोदावरी पात्रातील बेकायदेशीर वाळू उपसा, परळी शहरातील वाढती गुंडगिरी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भ्रष्टाचार करणारांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. अशा प्रकरणाला कोणी विरोध करत असेल तर त्याच्यावर खोटे आरोप करून बंदोबस्त करण्यात येतो. परळी तालुक्यातील तरुणाच्या हाताला काम मिळत नसल्यामुळे त्याच्यावर पुणे, मुबई येथे कामावर जाण्याची वेळ सतत येत आहे. परळी शहरात राखेच्या वाहतुकीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यावर कुठलेही नियंत्रण नाही. या सर्वाचे श्रेय घ्यावे, अशी टीका भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य उत्तम दादा माने यांनी पालकमंत्री धनंजय मुंडेंवर केली आहे.