दीड हजाराची लाच घेताना दलालासह तलाठी चतुर्भुज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 12:16 AM2018-02-28T00:16:05+5:302018-02-28T00:16:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : विहीर व बोअरची सातबाºयावर नोंद करण्यासाठी दीड हजार रूपयांची लाच घेताना तालुक्यातील आंबीलवडगाव येथील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : विहीर व बोअरची सातबाºयावर नोंद करण्यासाठी दीड हजार रूपयांची लाच घेताना तालुक्यातील आंबीलवडगाव येथील तलाठी दत्तू आत्माराम रोहिटे व दलाल स्वप्नील जाधव यांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी दुपारी नेकनूर ग्रामपंचायत परिसरात केली.
तक्रारदाराची आंबीलवडगाव शिवारात सहा एकरपैकी २ एकर शेतजमीन सात्रा-पोत्रा साठवण तलावासाठी शासनाने अधिग्रहित केली आहे. या शेतजमिनीतील विहीर, बोअरच्या नोंदीसाठी तलाठी रोहिटे याने १५०० रूपयांची लाच मागितली.
यावरुन तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचला. जाधव याच्यामार्फत रोहिटेने दीड हजार रूपये स्वीकारले. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या एसबीच्या अधिका-यांनी झडप घालत दोघांनाही जेरबंद केले. त्यांच्यावर नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.