आले तलाठ्याच्या मना, तो फेर ओढेचना; तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2022 05:12 PM2022-03-17T17:12:18+5:302022-03-17T17:12:18+5:30
मालकी हक्कात नोंद करण्यासाठी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेतली होती, मात्र अद्यापही सातबारावर फेर ओढण्यात आलेला नाही.
बीड : वडवणी तालुक्यातील खळवट निमगाव येथील सातबारामधील नोंदी दुरुस्त करून अर्जदाराचे नाव मालकी हक्कात घ्यावे, असे आदेश वडवणी तहसीलदारांनी काडी वडगावच्या तलाठ्यास दिले. या आदेशाला आठ महिन्यांहून अधिक कालावधी झाला, मात्र संबंधित तलाठ्याने त्यावर कोणतीच कार्यवाही केली नाही.
भीमा चव्हाण व जनार्दन चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या अर्जानुसार, वडवणी तालुक्यातील खळवट निमगाव येथील १० एकर ३४ गुंठे जमीन आमच्या मालकीची आहे. ही जमीन पूर्वीचे मालक तुकाराम व्यंकोबा राजमाने, त्र्यंबक विश्वनाथ देशमाने, उत्तम देशमाने यांच्याकडून १९७५ मध्ये घेतली होती. खरेदी खताच्या आधारे १९७८ मध्ये फेरफारमध्ये सातबाराच्या मालकी हक्कात नोंद घेण्यात आली होती. माजलगाव प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रासाठी त्यातील १ एकर १५ गुंठे जमीन शासनाने संपादित केली होती. उर्वरित ९ एकर २० गुंठे जमीन चव्हाण यांच्या ताब्यात आहे. दरम्यान, तहसील कार्यालयाने सातबारा नव्याने तयार केला. त्यात चव्हाण यांची नोंद परस्पर मालकी हक्कातून कमी करून इतर हक्कात घेण्यात आली आहे. यासंदर्भात चव्हाण बंधूंनी मालकी हक्कात नोंद करण्यासाठी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेतली होती, मात्र अद्यापही सातबारावर फेर ओढण्यात आलेला नाही.
वडवणी न्यायालयाने दिले आदेश
वडवणीचे नायब तहसीलदार एस.डी. रत्नपारखी यांच्या न्यायालयात हे प्रकरण चालले. ११ सप्टेंबर २०१७ रोजी दिलेल्या निर्णयात ९ एकर २० गुंठे फेर मालकी हक्कात घ्यावे, असे आदेशित केले होते. मात्र, तलाठ्याने नोंद घेतली नाही. २१ जून २०२१ रोजी वडवणी तहसीलदारांनी हे आदेश दिले आहेत. मात्र अद्यापही चव्हाण यांच्या सातबारा उताऱ्यावर फेर ओढण्यात आलेल