रोहयो समितीच्या तालुकाध्यपदी राख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:32 AM2021-03-20T04:32:28+5:302021-03-20T04:32:28+5:30
पाटोदा : महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना तथा रोहयो समितीच्या पाटोदा तालुका अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ...
पाटोदा : महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना तथा रोहयो समितीच्या पाटोदा तालुका अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आप्पासाहेब राख यांची निवड करण्यात आली आहे. इतर सदस्यांच्या ही निवडी करण्यात आल्या आहेत.
रोहयो समिती ही तालुक्यातील गरजू मजुरांना शासनाच्या वतीने रोजगार उपलब्ध करून देणारी ही एक महत्त्वाची समिती आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे व आ. बाळासाहेब काका आजबे यांच्या सूचनेवरून राख यांची तालुकाध्यक्षपदी नियुक्ती झाली. येत्या काही दिवसात साखर कारखान्यावरून मजूर मोठ्या प्रमाणावर स्वगृही तालुक्यात परततील. त्यांच्या रोजगार व उपजीविकेसाठी शासनाच्या वतीने असणाऱ्या रोहयो योजनेतील विविध कामे उपलब्ध करून दिली जातील असे, नवनियुक्त अध्यक्ष अप्पासाहेब राख म्हणाले.
===Photopath===
170321\2006img-20210308-wa0125_14.jpg