तलवाडा पोलिसांनी छेड काढणा-या रोमिओंना केले जेरबंद; काल विद्यार्थिनीने केला होता आम्हत्येचा प्रयत्न 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2017 07:12 PM2017-12-27T19:12:19+5:302017-12-27T19:14:15+5:30

गेवराई तालुक्यातील तळवट बोरगाव येथील एका विद्यार्थिनीची छेड काढणार्‍या दोन रोड रोमिओंविरूद्ध  तलवाडा पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा नोंद झाला आहे. या दोघांना तात्काळ बेड्याही ठोकण्यात आल्या आहेत.

Talwada policeman raided raiders; Our attempt was made by the student yesterday | तलवाडा पोलिसांनी छेड काढणा-या रोमिओंना केले जेरबंद; काल विद्यार्थिनीने केला होता आम्हत्येचा प्रयत्न 

तलवाडा पोलिसांनी छेड काढणा-या रोमिओंना केले जेरबंद; काल विद्यार्थिनीने केला होता आम्हत्येचा प्रयत्न 

googlenewsNext
ठळक मुद्देगढी येथे महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी येत असताना गावातीलच सचिन गाडे व दीपक गाडे या दोन रोडरोमिओंनी विद्यार्थिनीची छेड काढली होती. बदनामीच्या भीतीने सदरील विद्यार्थिनीने आजोबासाठी आणलेल्या दमा आजाराच्या तब्बल ३० गोळ्या गिळल्या होत्या.

बीड : गेवराई तालुक्यातील तळवट बोरगाव येथील एका विद्यार्थिनीची छेड काढणार्‍या दोन रोड रोमिओंविरूद्ध  तलवाडा पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा नोंद झाला आहे. या दोघांना तात्काळ बेड्याही ठोकण्यात आल्या आहेत. मुलीने दिलेल्या जवाबावरून वेगवेगळे गुन्हे नोंद झाले आहेत.

गढी येथे महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी येत असताना गावातीलच सचिन गाडे व दीपक गाडे या दोन रोडरोमिओंनी विद्यार्थिनीची छेड काढली होती. तसेच कॉल रेकॉर्ड करून सोशल मिडीयावर व्हायरल केला होता. बदनामीच्या भीतीने सदरील विद्यार्थिनीने आजोबासाठी आणलेल्या दमा आजाराच्या तब्बल ३० गोळ्या गिळल्या होत्या. यामुळे ती अत्यवस्थ झाली होती. तिच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तिने दिलेल्या जवाबावरून सचिन व दीपक गाडे या दोघांविरूद्ध वेगवेगळे गुन्हे तलवाडा पोलीस ठाण्यात दाखल केले आहेत. 

दरम्यान, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता तलवाडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांनी तात्काळ गावात जावून सचिन व दीपक गाडेला बेड्या ठोकल्या. सायंकाळी पाच वाजता त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. त्यांच्यावर पुढील कारवाई सुरू असल्याचे बांगर म्हणाले.

आणखी एका पथकाची स्थापना
जिल्हा, तालुका तसचे  प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीत एका छेडछाडविरोधी पथकाची स्थापना केली आहे. परंतु हे पथके सध्या सुस्त असल्याने संताप व्यक्त होत आहे. तळवट बोरगावच्या घटनेनंतर पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी पथकांना कडक सुचना देत कारवाया करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आणखी एका पथकाची नियुक्ती केली आहे. यामध्ये तीन पुरूष व तीन महिला पोलीस कर्मचारी असतील, असे श्रीधर म्हणाले.

Web Title: Talwada policeman raided raiders; Our attempt was made by the student yesterday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.