विजेच्या तारा तुटून स्पार्किंगमुळे चिंचेची बाग भस्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:32 AM2021-02-12T04:32:09+5:302021-02-12T04:32:09+5:30
खोकरमोहा येथील ॲड. रामकृष्ण मिसाळ, विठ्ठल मिसाळ, हौसाबाई मिसाळ आणि सिंधुबाई मिसाळ यांचे खोकरमोहा येथे दहा हेक्टर ...
खोकरमोहा येथील ॲड. रामकृष्ण मिसाळ, विठ्ठल मिसाळ, हौसाबाई मिसाळ आणि सिंधुबाई मिसाळ यांचे खोकरमोहा येथे दहा हेक्टर क्षेत्र असून, तेथे वीस वर्षांपूर्वी चिंचेच्या १९८४ झाडांची लागवड केली होती. गेल्या पाच वर्षापासून चिंचेला फळधारणा होत होती. चिंच बागेच्या संरक्षणार्थ चारी बाजूंनी खैराची सुमारे ३ हजार झाडे लावली होती. मंगळवारी वीज वाहिनीचे दोन खांब मोडल्याने तारा तुटून गवत आणि झाडाला आग लागली. यात मोठे नुकसान झाले. तलाठी जयश्री जायभाये यांनी बागेस भेट देऊन पंचनामा केला आहे. वेळेत दुरुस्ती न केल्याने कुजलेले पोल पडून ही दुर्घटना घडली आहे. या लाईनची एक तार अनेक दिवसांपासून घटना घडलेल्या शेतात लोंबकळत होती.