मांजरसुंबा घाटात भीषण अपघातात टँकरचा स्फोट; एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 12:03 PM2020-05-20T12:03:32+5:302020-05-20T12:07:07+5:30

टँकरने पेट घेतल्यामुळे चालकाला बाहेर पडता आले. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

Tanker blast in Manjarsumba Ghat; One dies on spot | मांजरसुंबा घाटात भीषण अपघातात टँकरचा स्फोट; एक ठार

मांजरसुंबा घाटात भीषण अपघातात टँकरचा स्फोट; एक ठार

googlenewsNext
ठळक मुद्देटँकर चालकाचा जळून जागीच मृत्यूएकावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु

बीड : मांजरसुंबा घाटात रसायन घेऊन जाणाऱ्या टँकरचा अपघात झाला. त्यानंतर टँकरने पेट घेतल्याने स्फोट झाला. यावेळी आगीचा मोठा भडका उडाला होता. ही घटना बुधवारी सकाळच्या सुमारस घडली, नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व पोलिसांना या घटनेची महिती दिली. त्यानंतर घटनास्थळी पोलीस व अग्निशमन दलाने तात्काळ धाव घेतली होती. मात्र, आगीचा भडका अचनाक उडाल्यामुळे एकाचा गाडीतच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

विशाखापट्टनमकडून गुजरात राज्यात रसायन घेऊन टँकर (क्र.जीजे १६ एव्ही ६१७७) जात होता. ट्रक  मांजरसुंबा घाटात येताच अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे टँकर उलटला झाला. रसायन असल्यामुळे टँकरने पेट घेतला. अचानक झालेल्या अपघातामुळे टँकरने पेट घेतला. यावेळी मोठी आग लागली होती, यावेळी परिसरातील नागरिकांनी तत्काल टँकरकडे धाव घेतली. मात्र, आगीने रौद्र रुप धारण केले होते. जखमीला दवाखान्यात पाठवण्यात आले. तसेच पोलिसांना व अग्निशमन दलाला या घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी व अग्निशमनच्या जवानांना ही आग आटोक्यात आणली. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी घाटातील वाहतूक सुरळीत केली.

 

टँकरने पेट घेतल्यामुळे चालकाला बाहेर पडता आले. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. सत्ते कुमार (२८, रा. उन्नवाल, खलीलाबाद संत कबीर नगर, उत्तरप्रदेश) असे मृत चालकाचे नाव आहे. तर करण विनोदप्रसाद गौतम (रा. बनारस उत्तरप्रदेश ) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणाची नोंद बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. अशी माहिती पोलीस ठाण्याचे प्रमुख सपोनि सुजीत बडे यांनी दिली.

 

Web Title: Tanker blast in Manjarsumba Ghat; One dies on spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.