सामाजिक संस्थांकडून रुग्णांचे चेहरे फुलविण्याचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 12:26 AM2018-10-25T00:26:17+5:302018-10-25T00:27:40+5:30
रूग्णांना होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी डॉक्टर्स प्रयत्नशील असतात. मोठ्या शहरातील डॉक्टरांना रूग्ण सेवेसाठी शहरात बोलावून सर्व सामान्य रूग्णांच्या चेहºयावर हसू फुलविण्याचे काम बीड शहरातील सामाजिक संस्था करत असल्याचे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : रूग्णांना होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी डॉक्टर्स प्रयत्नशील असतात. मोठ्या शहरातील डॉक्टरांना रूग्ण सेवेसाठी शहरात बोलावून सर्व सामान्य रूग्णांच्या चेहºयावर हसू फुलविण्याचे काम बीड शहरातील सामाजिक संस्था करत असल्याचे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी केले.
मुंबई येथील जर्मन फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या पुढाकारातून येथील विवेकांनद हॉस्पिटल येथे रोटरी क्लब, आदित्य डेंटल कॉलेज, जिल्हा रूग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय शिबिरात दुभंगलेले ओठ व टाळू तसेच नाक, कान यासह बाह्यविकृतीच्या २५० रुग्णांची तपासणी करुन गरजू २३ रुग्णांवर प्लास्टिक सर्जरी करण्यात आल्या. मुंबई येथील सर्जन डॉ.रंगनाथ झावर, डॉ.नितीन घाग, डॉ. रोहीत तोष्णीवाल, डॉ.संदीप येवले, डॉ.सचिन जेथलिया, डॉ. राहूल सारडा, डॉ.पी.सी.तांबडे, डॉ.प्रभाकर धायतडक, डॉ.संकेत बाहेती, डॉ.स्नेहल झावर, डॉ.पेनी मॅडम, डॉ.श्रीकांत केदार, डॉ.शशिकांत ठोंबरे आदींनी या शिबिरात योगदान दिले.
यावेळी बोलतांना डॉ. रंगनाथ झावर म्हणाले, शिबिरात तपासणीनंतर आवश्यक असलेल्या रूग्णांवर बीड येथे शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
बीड येथे शक्य नसणाºया संबंधित रुग्णांवर मुंबई येथे शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. रूग्णांची गरज पाहता असे तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर दर दोन महिन्याला बीड येथे घेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
यावेळी डॉ. प्रशांत देशपांडे, सुहास जोशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी.पवार, अति. जि. शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड, आर.एम.ओ. डॉ. एस.एल. हरिदास, डॉ. आदिती सारडा, शेषनारायण हाटवटे, रमेश तांगडे, राम मोटवाणी, प्रकाश कुलकर्णी, सुरेंद्र बारगजे, शिवलाल राठोड, वसंतराव डावकर, दादासाहेब डावकर, डॉ.बी.जी.झंवर, डॉ.तुषार श्रृंगारपुरे शिबीर प्रमुख विष्णूदास बियाणी, डॉ.अॅड.राजेंद्र सारडा, प्रकल्प सभापती सुरज लाहोटी आदिसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
प्रास्ताविक प्रकल्प सभापती विष्णूदास बियाणी यांनी तर सूत्रसंचालन डॉ.राजेंद्र सारडा यांनी केले. यावेळी रुग्ण तसेच त्यांचे नातेवाईक, सामाजिक कार्यर्कर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.